Jalna News : जालन्यात पिसाळलेल्या माकडांचा धुमाकूळ; गावातील अनेकांना चावून केले जखमी

जालन्यातील परतूर तालुक्यातील लिंगसा या गावामध्ये माकडाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे.
jalna news update
jalna news updatesaam tv
Published On

Jalna News Update : जालन्यातील (Jalna) परतूर तालुक्यातील लिंगसा या गावामध्ये माकडाने (Monkey) अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. या पिसाळलेल्या माकडांनी अनेकांना चावून जखमी केल्याची माहिती माहिती समोर आली आहे. या संपूर्ण प्रकारामुळे गावात दहशत निर्माण झाली आहे. (Jalna News In Marathi )

jalna news update
अर्जुन खोतकरांच्या ताफ्यामधील वाहनांचा भीषण अपघात; परवानगी नसताना केला समृद्धी महामार्गाचा वापर

मिळालेल्या माहितीनुसार, जालन्यातील परतून तालुक्यातील लिंगसा गावात माकडांचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. या पिसाळलेल्या माकडांनी गावातील नागरिकांना त्रस्त केले आहे. पिसाळलेल्या माकडांनी गावातील अनेकांना चावा घेऊन जखमी केले आहे. या माकडांची दहशत गावातील लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तीपर्यंत पसरली आहे. पिसाळलेले माकड नागरिकांच्या अंगावर धावून येत जखमी करत असल्याने भीतीचं वातावरण पसरले आहे.

आज, मंगळवारी लिंगसा गावात पिसाळलेल्या माकडांनी गावातील वृद्ध महिलेसह अनेकांवर हल्ला चढविला. माकडांच्या हल्ल्यात वृद्ध महिलेसह तीन ते चार जण जखमी झाले आहेत. माकडांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. मात्र, वन विभागाला या बाबत माहिती देऊनही वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून गावकरी दहशतीच्या सावटाखाली आहेत.

jalna news update
Shivsena Dasara Melava: शिवसेना दसरा मेळाव्यासाठी मुंबईत असा असेल कडेकोट बंदोबस्त

दरम्यान, पिसाळलेल्या माकडांच्या हल्ल्यामुळे गावातील वृद्ध आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या माकडांना पळविण्यासाठी गावकऱ्यांकडून नानाविविध उपाय करण्यात येत आहे. मात्र, तरीही माकडांकडून हल्ले सूरूच आहे. त्यामुळे गावकरी पिसाळलेल्या माकडांना अक्षरश: त्रस्त झाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com