Jalna News: मुन्नाभाई डॉक्टरकडून अवैध गर्भपात; अर्धवट गर्भपात केल्याने फाटली महिलेची गर्भ पिशवी

मुन्नाभाई डॉक्टरकडून अवैध गर्भपात; अर्धवट गर्भपात केल्याने फाटली महिलेची गर्भ पिशवी
Jalna Crime News
Jalna Crime NewsSaam tv
Published On

जालना : औरंगाबाद पाठोपाठ जालन्यातही बेकायदा अवैधरित्या मुन्नाभाई डॉक्टरकडून गर्भपात केल्याची धक्कादायक घटना समोर आली. बदनापूर तालुक्यातील (Jalna News) गेवराई बाजार या गावातील मुन्नाभाई डॉक्टरने (Doctor) महिलेच्या पतीच्या संमतीने एका मित्राच्या मदतीने अज्ञात ठिकाणी ३६ वर्षीय महिलेला घेऊन जात गर्भपात केल्याची धक्कादायक घटना समोर आली. (Letest Marathi News)

Jalna Crime News
Jalna News: आवक वाढल्याने दर घसरले; टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत

गर्भपाताच्या दोन दिवसानंतर महिलेच्या पोटात वेदना सुरू झाल्यानंतर महिलेला रक्तस्त्राव सुरु झाला. त्यात तिची प्रकृती गंभीर झाल्याने नातेवाईकांनी तिला उपचारासाठी जालना शहरातील काकड हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांच्या उपचारा दरम्यान महिलेचा गर्भपात करताना तिचा गर्भ अर्थवट राहिल्याने व गर्भपात करताना गर्भ पिशवी फाटल्‍याची धक्कादायक बाब समोर आली. यानंतर डॉक्टरांनी या महिलेवर तात्काळ शस्त्रक्रिया करत संबंधित घटनेची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांना देऊन संबंधी प्रकरणी नोंद केली आहे.

आरोग्‍य विभागाकडून दखल नाही

दरम्यान काकड हॉस्पिटलच्या माहितीनंतर घटनेला २० दिवस उलटूनही जिल्हा आरोग्य विभागाकडून कारवाईसाठी कुणीच पुढे येत नसल्याने अखेर बदनापूर पोलिस ठाण्याच्या हेड कॉन्स्टेबल जोहरसिंग मलखांबसिंग कलाणी यांनी हॉस्पिटलकडून दाखल करण्यात आलेल्या MLC वरून आज बदनापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यावरून महिलेच्या पतीसह मुन्नाभाई डॉ. मनोहर जाधव व त्याचा अज्ञात मित्र आणि गर्भपात करणारा अज्ञात डॉक्टर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणी मुन्नाभाई डॉक्टरसह महिलेचा पती फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

बीएएमएस डिग्री सांगून व्‍यवसाय

डॉ. मनोहर जाधव हा मुन्नाभाई डॉक्टर असल्याची माहिती ही समोर आली. तो गेल्या अनेक वर्षांपासून बदनापूर तालुक्यातील गेवराई बाजार या गावात साई क्लिनिक नावाने दवाखाना चालवत असल्याची माहितीही समोर आली आहे. तो आपली डिग्री बी.ए.एम.एस असल्याची सांगून व्यवसाय करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यापूर्वी जिल्हा आरोग्य विभागाच्या पथकांनी त्यांच्या हॉस्पिटलला जाऊन डिग्री बाबत तपासणी करण्याचा प्रयन्त केला. मात्र पथक येण्यापूर्वीच हा डॉक्टर कुलुप लावून पळून जात होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com