Gulabrao Patil
Gulabrao PatilSaam tv

Gulabrao Patil: वर दाढीवाले बाबा, मुख्यमंत्री दाढीवाले आणि मी पाण्यावाला बाबा; मंत्री गुलाबराव पाटील

वर दाढीवाले बाबा, मुख्यमंत्री दाढीवाले आणि मी पाण्यावाला बाबा; मंत्री गुलाबराव पाटील
Published on

जालना : वर दाढीवाले बाबा, मुख्यमंत्री दाढीवाले आणि मी पाण्यावाला बाबा म्हणून मला पाणीपुरवठा खातं मिळाले. (Jalna News) सरकारमध्ये सगळ्यांचे खाते बदलले पण माझं खातं कायम ठेवल्‍याचे राज्याचे स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराब पाटील (Gulabrao Patil) यांनी म्हटले आहे. (Breaking Marathi News)

Gulabrao Patil
Nashik News: कांदा प्रश्नावर शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना लिहिले रक्ताने पत्र; अग्निडाग कार्यक्रमासाठी दिले निमंत्रण

मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जालना जिल्ह्यातील नळ पाणीपुरवठा योजनांचा ई- उद्‌घाटन सोहळा पार पडला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाप बदलले; अशी टीका केली. याबाबत प्रश्न विचारला असता गुलाबराव पाटील चांगलेच भडकले. हे बघा, पाण्यावर विचारा. विनायक राऊत पाणीवाला नाहीये, असा प्रश्न त्यांनी पत्रकारांना विचारला.

ठाकरे गटाचे कार्यालय ताब्यात घेणारन नाही

उध्दव ठाकरे गटाने शिवसेना पक्षाचा निधी कुठे वळवला याबाबत मला कल्पना नाही. त्यांच्या पक्ष निधीवर कोणताही दावा सांगणार नाही असंही त्यांनी सांगितलं. तसेच राज्यातील उद्धव ठाकरे गटाचे कोणतेही कार्यालय ताब्यात घेणार नसल्‍याचेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com