Jalna News: अंबडच्या जंगी तलावात हजारो माशांचा मृत्यू; संसर्गजन्य रोगाची शक्यता

अंबडच्या जंगी तलावात हजारो माशांचा मृत्यू; संसर्गजन्य रोगाची शक्यता
Jalna News
Jalna NewsSaam tv

जालना : जालना शहरातील मोती तलावात हजारो माशांचा मृत्यूची घटना ताजी असताना अंबड (Ambad) शहरातील जंगी तलावात तब्बल ३५ ते ४० टन मासे मृत अवस्थेत आढळून आले आहेत. यामुळे मच्छिउत्पादकात एकच खबळ उडालीय. (Letest Marathi News)

Jalna News
Women's Day: महिला दिनी मुलीचा जन्म; मुलीचा संपूर्ण खर्च करणार हॉस्पिटल

अंबड शहरातील जंगी तलावात सैफाल फारुकी या मच्छि उत्पादक गुतेदाराने अंबड नगरपरिषद यांच्याकडे १८ लाख २२ हजार रुपये भरून मच्छि उत्पादनासाठी टेंडर ही घेतले आहे. दरम्यान जास्त पाऊस झाल्याने त्यांनी तलावात दोन वेळा बीज टाकूनही ते बीज सांडव्यातून वाहून गेले. त्यात त्यांनी इकडून तिकडून पैसे जमवत तिसऱ्यांदा तलावात बीज सोडले. त्यासाठी त्यांनी ९ लाख ६० हजाराचा खर्च ही केला. उत्पन्न बाजारात नेण्या योग्य झाले असताना आज त्यांना तलावात तब्बल ३५ ते ४९ टन माशांचा मृत्यु झाल्याची बाब लक्षात आली. यात त्यांचे तब्बल यात ३२ लाखाचे नुकसान झाले आहे.

या प्रकरणी नगर परिषद प्रशासनाने तात्काळ मृत माशांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठून नुकसान भरपाई द्यावी; अशी मागणी या मच्छि उत्पादक गुतेदारांनी केली. दरम्यान गेल्या आठवड्यात जालन्यातील मोती तलावात अशाच प्रकारच्या माशांचा मृत्यू संसर्गजन्य आजारानं झाला असावा असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला होता. त्यामुळे आज झालेल्या माशांच्या मृत्यूमुळे मच्छि उत्पादकात एकच खबळ उडालीय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com