बदनापूर नगरपंचायत अध्यक्षपदी भाजपच्या मंगल बारगजे

Jalna news
Jalna news Saam tv
Published On

जालना : बदनापूर नगर पंचायत अध्यक्ष पदासाठी आज निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत भाजपच्या मंगल जगन्नाथ बारगजे यांची निवड करण्यात आली. (jalna news badnapur nagar panchayat mayor bargaje)

पंचायत निवडणुकीत भाजप 9, काँग्रेस 1, राष्ट्रवादी 5, अपक्ष 2 अशा जगा मिळाल्या होत्या. बदनापूर नगरपंचायत नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून मंगल बारगजे आणि राष्ट्रवादीकडून नसीमाबी शेख यांचे उमेदवारी अर्ज दाखल होता. भाजपच्या अध्यक्ष पदासाठी अर्ज केलेल्या मंगल जगन्नाथ बारगजे यांना भाजपचे 9 व 2 अपक्ष सदस्यांचा पाठींबा मिळाल्याने त्यांचे संख्याबळ 11 झाले. यामुळे त्यांना स्पष्ट बहुमत मिळाल्याने त्यांची अध्यक्षपदी निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केले.

काँग्रेस, राष्ट्रवादीचे सदस्य ग़ैरहजर

निवडणूक प्रकिया दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या 5 व काँग्रेस च्या 1 सदस्यांनी अनुपुस्थिती दर्शविल्याने मंगल जगन्नाथ बारगजे यांची निवड करण्यात आली. तर भाजपकडून उपनगराध्यक्ष पदासाठी समीर शेख यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल होता. यामुळे त्यांची उपनगराध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली. दरम्यान भाजपा आमदार नारायण कुचे यांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्यासह सर्व नगरसेवकांचा सत्कार करत कार्यकर्त्यासह जल्लोष साजरा केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com