जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन अधिक तीव्र केले जात आहे. ठिकठिकाणी जाळपोडच्या घटना सुरूच आहेत. याच दरम्यान (Jalna News) जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथील पंचायत समितीचे कार्यालयच जाळून टाकण्यात आल्याची घटना घडली आहे. यात संपूर्ण रेकॉर्ड (Maratha Aarkshan) जाळून गेल्याची माहिती समोर आली आहे. (Tajya Batmya)
मराठा आरक्षणासंदर्भात सरकार अजून कोणताही सकारात्मक निर्णय घेत नाही. यामुळे मराठा समाजाकडून आंदोलन अधिक तीव्र केले जात आहे. राज्यातील अनेक भागात टायर जाळून रास्ता रोको केले जात आहे. शिवाय वाहनांवर दगडफेकीच्या घटना देखील घडल्या आहेत. महामंडळाच्या बसचे देखील नुकसान करण्यात आले आहे. याच दरम्यान घनसावंगी येथील पंचायत समितीचे कार्यालयाला पहाटेच्या सुमारास आग लावण्यात आली आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
कागदपत्र जळून खाक
मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरु असताना आज सकाळी सहाच्या सुमारास अज्ञात तरुणांनी घनसावंगी पंचायत समितीच्या कार्यालयला आग लावली. या आगीत पंचायत समिती कार्यालयातील सर्व कागदपत्र जळून खाक झाल्याने शासकीय रेकॉडचे मोठे नुकसान झाले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.