Maratha Reservation: जालन्यातील २५० गावांमध्ये राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी; निवडणुकांवर बहिष्कार, मराठा आंदोलक संतापले

Jalna Maratha Reservation: मराठा आरक्षणप्रकरणी मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेची झळ आता राजकीय नेत्यांना देखील बसू लागली आहेत.
Jalna district 245 village ban politician entry and-boycott polls on maratha Reservation demand
Jalna district 245 village ban politician entry and-boycott polls on maratha Reservation demandSaam TV
Published On

Jalna Maratha Reservation

मराठा आरक्षणप्रकरणी मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेची झळ आता राजकीय नेत्यांना देखील बसू लागली आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला असून जालन्यातील २५० गावांमध्ये राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर निवडणुकांवरही बहिष्कार टाकण्यात आला आहे. (Latest Marathi News)

Jalna district 245 village ban politician entry and-boycott polls on maratha Reservation demand
Ajit Pawar News: कंत्राटी भरतीचा निर्णय योग्यच होता, पण... अजित पवारांकडून समर्थन, विरोधकांवर टीका

जोपर्यंत मराठा समाजाला (Maratha Reservation) आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत गावात येऊ देणार नाही, असा इशाराही गावकऱ्यांकडून देण्यात आला आहे. यामुळे राजकीय नेत्यांची मोठी कोंडी होत असून त्यांना मोठा मनस्तापही सहन करावा लागत आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भाजप आमदार नारायण कुचे, आमदार बबनराव लोणीकर, आणि पालकमंत्री अतुल सावे, यांचे कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न झाला आहे.

इतकंच नाही, रावसाहेब दानवे यांच्या कन्या आशा पांडे यांचाही एक राजकीय कार्यक्रम मराठा आंदोलकांनी उधळून लावल्याची माहिती आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील (Jalna News) अंतरवली सराटी गावात उपोषण केलं होतं. राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं.

एक महिन्याचा वेळ द्या आम्ही आरक्षणाचा निर्णय घेऊ, असं सरकारच्या वतीने सांगण्यात आलं. त्यानुसार, जरांगे यांनी सरकारला ४० दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. आता हा अल्टिमेटम संपत आला आहे. दरम्यान, ४० दिवसांची मुदत देऊन सुद्धा सरकारने आरक्षणासाठी ठोस पाऊलं उचलली नसल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केला आहे.

जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत गावात पाय ठेवू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे. त्यानुसार, जालन्यातील २४५ गावांनी एकमताने ठराव घेत राजकीय नेत्यांना गावात प्रवेशबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर आगामी निवडणुकीत मतदानावर बहिष्कारही टाकण्यात आला आहे.

Edited by - Satish Daud

Jalna district 245 village ban politician entry and-boycott polls on maratha Reservation demand
Jalna Accident News: भरधाव ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; बाप-लेकासह एकाचा जागीच मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com