Jalna Crime : अज्ञात तरुणाची हत्या करून मृतदेह रस्त्यावर फेकला; देवगाव शिवारातील घटना

घटनेची माहिती मिळतच परिसरातील नागरिकांमध्ये एकच खबळ...
Jalna Crime
Jalna CrimeSaam Tv
Published On

Jalna News : जालना- औरंगाबाद महामार्गावर बदनापूर तहसिल कार्यालयाजवळ असलेल्या देवगाव शिवारात 30 ते 32 वर्षीय अज्ञात तरुणाचा रक्ताने माखलेला मृत्यदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खबळ आहे

Jalna Crime
Kirit Somaiya : कोविड काळातील कमाईचा हिशोब द्या; किरीट सोमय्या यांनी ट्विट करत सुजित पाटकरांना केला सवाल

घटनेची माहिती मिळातच महामार्गावरील जाणाऱ्या लोकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. प्रवाशी लोकांनी घटनेची माहिती बदनापूर (Badnapur) पोलिसांना कळवंताचा बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी गजानन जारवाल यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा करण्याच्या प्रक्रियेला सुरवात केली.

Jalna Crime
Accident News: मद्यधुंद तरूणांची दुचाकीला धडक; पती-पत्नीचा मृत्यू

अज्ञात व्यक्तीने छातीत आणि डोक्यात वार करून खून केला असावा व मृत्यदेह रोड जवळ आणवून टाकला असावा असा अंदाज पोलिसांकडून (police) व्यक्त केला जात आहे. सदरील खून झालेल्या तरुणांची ओळख अजून पटली नसून या तरुणाचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.खून झाल्याची माहिती कळताच घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केला होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com