Jalna Accident: भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडलं, अपघातात २ जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू

Jalna Police: जालनामध्ये भरधाव ट्रकने दोन तरुणांना चिरडलं. या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. हे तरुण जिवलग मित्र होते. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला. जालना पोलिस अपघाताचा तपास करत आहेत.
Jalna Accident: भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडलं, अपघातात २ जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू
Jalna AccidentSaam Tv
Published On

अक्षय शिंद, जालना

जालन्यामध्ये भीषण रस्ते अपघातामध्ये दोन जीवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. जालना शहरातील अंबड चौफुली परिसरात भरधाव ट्रकने दुचाकीचा जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये २५ वर्षींय दोन तरुणा गंभीर जखमी झाले. या दोघांचागी रस्त्यावर तडफडून मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, जालना शहरातील अंबड चौफुली परिसरामध्ये शुक्रवारी रात्री अपघाताची ही घटना घडली. ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अशोक गायकवाड आणि तुळशीदास ढगे अशी मृत तरुणांची नावं आहेत. हे दोन्ही तरुण एकाच गावातील असून जीवलग मित्र होते.

Jalna Accident: भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडलं, अपघातात २ जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू
Jejuri Accident: यात्रेनिमित्त जेजुरीला जाणाऱ्या वाहनाचा अपघात, २ जण ठार; १४ जण गंभीर जखमी

या अपघातात मृत झालेले दोन्ही तरुण जालना शहराच्या जवळ असलेल्या शिरसवाडी गावचे रहिवासी होते. ते एका खासगी कामानिमित्त रात्री उशिरा जालना शहरात आले होते. काम संपवून दोघेही दुचाकीने जालना शहरातून परत गावाकडे जात होते.

त्याचवेळी वाटेत भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की त्यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. अशोक आणि तुळशीदास यांच्या मृत्यूमुळे शिरसवाडी गावावर शोककळा पसरली आहे. दोन्ही मित्रांवर शिरसवाडी गावातील स्मशानभूमीत एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघाताचा तपास जालना शहर पोलिस करत आहेत.

Jalna Accident: भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडलं, अपघातात २ जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू
Nagpur Accident : टेम्पोनं टर्न घेतला, भरधाव दुचाकीची धडक, केटरिंगच्या कामाहून परतताना दोघांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com