
बालविवाह रोखण्यासाठी जळगावच्या उत्राण ग्रामपंचायतीने अनोखा उपक्रम राबवला आहे. गावातील प्रत्येक नव वधुसाठी ग्रामपंचायतीतर्फे कन्यादान योजना सुरू करण्यात आली आहे. जळगवा जिल्ह्यातील एकमेव उत्राण ग्रामपंचायतच्या वतीने सुरू कन्यादान योजना करण्यात आली आहे. कन्यादान योजनेतून मुलीच्या लग्नासाठी ग्रामस्थांना ५ हजार रुपये दिले जाणार आहे. उत्राण ग्रामपंचायतीच्या निर्णयामुळे हातभार लागणार आहे.
जळगावच्या उत्राण ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच आणि सदस्यांच्या बैठकीत एक अनोखा ठराव पारित करण्यात आला. यात उत्राण गावातील प्रत्येक नववधू मुलीला ग्रामपंचायतच्या वतीने कन्यादान योजनेचा लाभ मिळणार आहे. याकरता प्रत्येक नववधूला आपल्या माहेरी आणि सासरी एका वृक्षाचे संगोपन करण्याच्या अटीवर ही योजना पारित करण्यात आली आहे. या योजनेतून वृक्ष संवर्धन आणि प्रदूषणाला आळा बसण्याचाही उपदेश ठेवण्यात आला आहे. तर दुसरीकडे बालविवाह रोखण्यासाठी आणि गरिबांच्या मुलीच्या लग्नासाठी आधार देण्यासाठी ग्रामपंचायतीच्या हा कन्यादान योजनेचा अनोखा उपक्रम राबविला जात आहे.
मुलं आणि मुलींच्या संख्येचा वाढता असमतोल कमी करणे, लेक वाचवण्यासाठी आणि तिचा गौख व्हावा म्हणून विविध पातळीवर योजना राबवल्या जात असल्या तरी गाव पातळीवर कुठलीही योजना राबवण्यात येत नाही. अशात्य उत्राण ग्रामपंचायतीने ग्रामसभेचा ठराव मंजूर करून कन्यादान योजना सुरू केली आहे. त्यात मुलीच्या पालकांना ५ हजार रुपये देण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीत मुलींच्या लग्नासाठी कन्यादान योजना सुरु करण्यात आली. याबाबत ग्रामसभेत ठराव मंजूर करण्यात आला.
गावातील १८ वर्ष पूर्ण झालेल्या मुलीचे कायदेशीर विवाह होईल, त्या मुलीच्या पालकांना ग्रामपंचायतीमार्फत लग्नाच्या वेळी ५ हजार रुपये कन्यादान म्हणून दिले जाणार आहे. तसंच आज पर्यावरणाबाबत समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे त्याचे रक्षण करणे काळाची गरज आहे. त्यासाठी कन्यादान योजनेचा लाभ घेणाऱ्या लेकीने सासरी जाताना आपल्या आई-वडिलांच्या घराजवळ आणि एक झाड सासरी गेल्यावर लावावे, असे आवाहनही ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.