अवघ्या १३० रूपयांच्‍या उधारीने घेतला जीव

अवघ्या १३० रूपयांच्‍या उधारीने घेतला जीव
Pune Crime News in Marathi
Pune Crime News in MarathiSaam tv

रावेर : टपरी चालकाची उधारी होती. ही अवघ्या १३० रूपयांची उधारीच्‍या कारणावरून तरूणाचा खून करण्यात आल्याची धक्‍कादायक घटना घडली. ऐनपूर (ता. रावेर) येथे सदर घटना घडल्याने खळबळ (Crime News) उडाली आहे. (jalgaon-raver-crime-news-Murder-of-a-young-man-on-a-loan)

Pune Crime News in Marathi
पहाटे पाचच्या अगोदरची अजान भोंग्यावर नाही; जळगावात मशिद ट्रस्टी मौलवी बैठकीत निर्णय

ऐनपूर येथे रात्री वैयक्तीक वादातून हा भयंकर (Jalgaon News) प्रकार घडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. भीमसिंग जगदीश पवार (वय २८) असे खून झालेल्‍या तरूणाचे नाव आहे. ऐनपूर येथे पन्नालाल कोरकू याची टपरी असून त्याचे उधारीचे १३० रुपये भीमसिंग पवार याच्याकडे बाकी होते. यात गुरूवारी (५ मे) रात्री उधारीच्या पैशांवरून दोघांमध्ये वाद झाला. त्यात पन्नालाल कोरकू (वय ५५) याने भीमसिंग पवार याचे गुप्तांग पिरगळले यात इजा झाली. भीमसिंगला तत्काळ रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तपासणी करून त्यास मृत घोषित केले. (Pune Crime News in Marathi)

आरोपी ताब्यात

अवघ्या १३० रूपयांसाठी भीमसिंगचा जीव गेल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच फैजपूर विभागीय पोलिस (Police) अधिकार्‍यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील प्रमुख आरोपी पन्नालाल कोरकू याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com