Jalgaon: जिल्ह्यातील ३६ गावांच्या पाणीस्त्रोतांना यलो कार्ड

जिल्ह्यातील ३६ गावांच्या पाणीस्त्रोतांना यलो कार्ड
Jalgaon News
Jalgaon NewsSaam tv

जळगाव : पावसाळ्यात ग्रामीण भागात दुषीत पाण्यामुळे अतिसाराची लागण व संसर्गजन्य आजारांची लागण होत असल्याने दरवर्षी जि.प.च्या आरोग्य विभागाकडून प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्त्रोतांचे सर्वेक्षण करण्यात येते. त्याचा अहवाल प्राप्त झाला असुन (Jalgaon News) जिल्ह्यात नांद खुर्द येथे दुषीत पाणी पुरवठा होत असुन त्या गावाला रेड कार्ड देण्यात आले आहे. तर येलो कार्डमध्ये ३६ गावांचा समावेश आहे. या गावांना देखील दुषीत पाणी पुरवठा होत आहे. (Yellow card for water resources of 36 villages in the jalgaon district)

Jalgaon News
चाळीसगाव तालुक्यात जलबचतीची चळवळ; ‘सकाळ रिलीफ फंड’चे सहकार्य

जि.पच्या (Jalgaon ZP) आरोग्य केंद्रामार्फत आरोग्य कर्मचाऱ्यांना त्यांच्या अखत्यारीत गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या जलस्त्रोताचे नमुणे घ्यावे लागतात. त्या नमुन्यांची तपासणी प्रयोगशाळेत करण्यात येते. सदर पाणी पिण्या योग्य आहे की नाही याची तपासणी केली जाते. ज्या गावांचे स्त्रोत ७५ टक्के स्त्रोत दुषीत आहेत; अशा गावांच्या ग्रापंला 'रेड कार्ड' दिले जाते. तर हिरवेकार्ड असलेल्या गावांमध्ये ३५ टक्के खाली जलस्त्रोत दुषीत असल्यास त्याचा समावेश होतो. तर ३५ ते ७५ टक्के जलस्त्रोत दुषीत राहील्यास त्या गावांच्या ग्रा.पंला 'यलो कार्ड' दिले जाते.

७७ प्राथमिक आरोग्य केंद्राकडून सर्वेक्षण

महिनाभरात जिल्ह्यातील ७७ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावांमधील जलस्त्रोतांचे नमुने घेण्यात आले आहे. त्यात सर्वाधिक ११ गावे धरणगाव (Dharangaon) तालुक्यातील असुन या गावांना यलो कार्ड देण्यात आले आहे. तालुक्यातील ४ आरोग्य केंद्रापासून ही तपासणी करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ पाचोरा व रावेर तालुक्यातील प्रत्येकी ५ गावे यात आहे.

यलो कार्डमध्ये समावेश असलेले गाव

जिल्ह्यात पाण्याचे तपासणी करण्यात आलेल्या गावांमध्ये ३५ ते ७५ टक्के दरम्यान जलस्त्रोत दुषीत आहे अशा गावांमध्ये ३६ गावांचा समावेश आहे.यात भडगाव तालुक्यातील पथराड, पथराड तांडा, पांढरद, नगरदेवळा स्टे व गेट, वडगाव नालबंदी, महिंदळे, चाळीसगाव तालुक्यातील पाटणा, बोरखेडा खु. धरणगाव तालुक्यातील बांभोरी, रेल, सतखेडा, अहिरे बु. अहिरे खु., चमगाव, निंभोरा, चावलखेडा, हणुमंतखेडा खु., कंडारी बु. तर जामनेर तालुक्यातील नागण खु, डोहरी तांडा, जळगाव तालुक्यातील असोदा, विदगाव, ममुराबाद, आव्हाणे, रावेर तालुक्यातील गहुखेडा, रायपुर, रणगाव, तासखेडा, सुदगाव, यावल तालुक्यातील डोंगरकठोरा, किनगाव बु., कासावा, अकलुद, कठोरा या गावांचा समावेश आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com