Jalgaon: मृत्यूच्या दारातून आल्या परत; बिबट्याच्‍या भीतीने नदीत उडी, साठ किमीपर्यंत वाहिली महिला

मृत्यूच्या दारातून आल्या परत; बिबट्याच्‍या भीतीने नदीत उडी, साठ किमी अंतरापर्यंत वाहिली महिला
Jalgaon News
Jalgaon NewsSaam tv

कळमसरे (जळगाव) : ‘देव तारी त्याला कोण मारी’ असाच काहीसा अनुभव चोपडा तालुक्यातील कोळंबा येथील (Leopard) बिबट्याच्या भीतीने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी दुथडी भरून वाहणाऱ्या तापी नदीत झोकून देणाऱ्या लताबाई दिलीप कोळी (वय 50) यांच्या बाबतीत घडला. सायंकाळी ते रात्र व सकाळपर्यंत सुमारे पंधरा तास पाण्याच्या प्रवाहात वाहत येत मरणाच्या दाढेतून परत आल्याने त्यांचे धैर्य खरोखर धाडसी महिलेचे (Jalgaon) असल्याने त्याची चर्चा सर्वत्र होत आहे. (Jalgaon Chopda News)

Jalgaon News
दुर्देवी..वीज पडून पिता-पुत्राचा मृत्‍यू; दोन महिला थोडक्यात बचावल्या

चोपडा (Chopda) तालुक्यातील कोळंबा येथील रहिवासी लताबाई दिलीप कोळी ह्या शुक्रवारी (9 सप्‍टेंबर) तापी नदी (Tapi River) काठावर शेतात शेंगा तोडण्यासाठी गेल्या होत्या. अशातच लताबाई यांच्या नजरेस पडले ते भयावह दृश्य. चक्क बिबट्या शिकार करण्यासाठी कुत्र्याच्या पाठीमागे लागलेला. अशातच बिबट्या आपलीही शिकार करेल; या भीतीने त्यांनी तेथुन नदीच्या दिशेने वाटचाल करीत दुथडी भरून वाहणाऱ्या तापी पात्रात उडी घेतली. डोळ्यासमोर एकच प्रश्न की बिबट्याच्या तावडीतून जीव कसा वाचेल.

केळीच्या खोड्याच्या आधाराने काढली रात्र

लताबाई पाण्याच्या प्रवाहात वाहत येताना पाडळसरे धरण ओसंडून वाहत असताना केळीचे खोड हाताला लागले. त्याचा आसरा घेत ती रात्री निम शिवारात काठालगत पाण्यातच रात्र काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजेच्या सुमारास निम मांजरोद दरम्यान नाव चालवणारे शंकर कोळी यांना त्‍या नजरेस पडल्‍या असता त्यांनी निम येथील ग्रामस्थांच्या मदतीने लताबाई यांना बाहेर काढले. मात्र त्या पूर्णतः गलीतगात्र झालेल्या होत्या. त्यांच्यावर मारवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचार करण्यात आले. सुमारे 14 ते पंधरा तास पाण्यात वाहत येत केळीच्या खोड्याच्या आधाराने त्या सही सलामत बाहेर पडल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com