पहिल्‍याच पावसात मनुदेवीचा धबधबा ओसंडून वाहतोय

पहिल्‍याच पावसात मनुदेवीचा धबधबा ओसंडून वाहतोय
Manudevi Waterfalls
Manudevi WaterfallsSaam tv

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये दोन दिवसांपासून पाऊस होत आहे. यात रविवारी मुसळधार पाऊस झाला. यामुळे डोंगर परिसरात पाणी वाहत आहे. यामुळे सातपुड्याच्या पर्वतरांगात पहिल्याच (Rain) पाऊसात श्रीक्षेत्र मनुदेवी येथील धबधबा ओसंडून वाहू लागला आहे. (jalgaon news satpuda hills Manudevi waterfall is overflowing in the first rain)

Manudevi Waterfalls
घराच्या छतावर फुलवली आकर्षक बाग; टाकाऊ वस्तूचा वापर करत आकर्षक सजावट

जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात सातपुडा पर्वत रांगांमध्ये मुसळधार पाऊस झाला असून सातपुड्याच्या पर्वतरांगात झालेल्या पहिल्याच पावसात श्रीक्षेत्र मनुदेवी येथील धबधबा ओसंडून वाहू लागला आहे. तसेच सातपुडा पर्वत रांगांमधील अनेक नद्या– नालेदेखील ओसंडून वाहू लागले आहेत. श्रीक्षेत्र मनुदेवी येथील धबधबा हा प्रसिद्ध असल्याने मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात भाविक व पर्यटक या ठिकाणी येतात. त्यामुळे पहिल्याच पावसात हा धबधबा ओसंडून वाहू लागल्याने भाविकांची व पर्यटकांची गर्दी याठिकाणी वाढण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com