दसऱ्याच्‍या दिवशीच घराची राख; पहाटे सिलेंडरचा स्‍फोटने उध्‍वस्‍त

दसऱ्याच्‍या दिवशीच घराची राख; पहाटे सिलेंडरचा स्‍फोटने उध्‍वस्‍त
दसऱ्याच्‍या दिवशीच घराची राख; पहाटे सिलेंडरचा स्‍फोटने उध्‍वस्‍त

रावेर (जळगाव) : ऐन दसऱ्याच्या दिवशी सकाळी चहा करत असताना तालुक्यातील ऐनपूर येथील एका शेतमजूर कुटुंबाच्या घरातील गॅस सिलेंडरचा प्रचंड स्फोट होऊन मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने प्राणहानी टळली असली तरीही ऐन दसऱ्याच्या दिवशी कुटुंब उघड्यावर आले आहे. घरात पिण्यासाठी पाणीही नाही अशी कुटुंबाची स्थिती झाली आहे. (jalgaon-news-raver-enpur-village-gas-cylinder-blast-in-the-morning)

रावेर तालुक्यातील ऐनपुर येथील बारी घाट परिसरात राहणाऱ्या सुशिलाबाई जगन्‍नाथ बारी (वय ६६) या मोलमजुरी करणाऱ्या महिला आपला मुलगा, सून आणि दोन नातवंडांसह राहतात. आज (ता. १५) सकाळी साडेसातच्या सुमारास गॅसवर चहा करत असताना अचानक गॅसच्या नळीने पेट घेतला. गॅसचा भडका होताच घरातील सर्वजण घाबरून घराबाहेर पळाले.

सिलेंडरचे दोन तुकडे

आगीने रौद्र रूप धारण केले आणि नंतर झालेल्या स्फोटात पत्र्याचे घर आणि घरातील सर्व सामान अक्षरश: उध्वस्त झाले . हा स्फोट इतका भयानक होता की, गॅस सिलेंडरचे दोन तुकडे झाले. या घराच्या विटांचे आणि मातीचे तुकडे शंभर- दोनशे मीटर अंतरावर जाऊन पडले आणि घरावरील पत्रे, लोखंडी कपाट, संसारोपयोगी साहित्य आगीत जळून नष्ट झाले.

दसऱ्याच्‍या दिवशीच घराची राख; पहाटे सिलेंडरचा स्‍फोटने उध्‍वस्‍त
धक्‍कादायक..आईसमोरच मुलीला पाजले विष; पैशांच्या वादातून घटना

सारे काही जळून खाक

बारी परिवार अतिशय गरीब असून मोलमजुरी करणारा आहे. सुशीलाबाईचा मुलगाही भाजी विक्री करुन आपला उदरनिर्वाह चालवतो. आता ऐन दसऱ्याच्या दिवशी घरात पिण्यासाठीही पाणी नाही. घरातील संसारोपयोगी सामान लोखंडी कपाट अंथरूण-पांघरूण सर्व जळून नष्ट झाले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com