Bribe: शेड बांधणीच्‍या कामासाठी लाच; कनिष्‍ठ लिपीक ताब्‍यात

शेड बांधणीच्‍या कामासाठी लाच; कनिष्‍ठ लिपीक ताब्‍यात
Bribe
Bribesaam tv

जळगाव : जामनेर पंचायत समितीत शेड बांधणीचा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर कामाची वर्क ऑर्डर काढायची होती. यासाठी तीन हजाराची लाच घेतांना पंचायत समितीतील कनिष्ठ लिपीकाला अटक करण्यात आली आहे. (jalgaon news jamner panchayat samiti Bribe for shed construction work)

Bribe
Kidnapping: हजार रुपयांत महिलांनी केली तरुणाची विक्री; ठेकेदाराच्या तावडीतून केली सुटका

शेवगे पिंप्री (ता. जामनेर) (Jamner) येथील तक्रारदार यांनी गाईचा गोठा शेड बांधणीचा प्रस्ताव मंजुर झाला होता. शेडच्या बांधणीचे काम सुरू करण्यासाठी लागणारी वर्क ऑर्डर मिळवून देण्याच्या मोबदल्यात पंचायत समितीचे कनिष्ठ लिपीक वसंत पंडीत बारी याने तीन हजार रूपयांची मागणी (Bride) केली. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार दिली.

सकाळीच रचला सापळा

प्राप्‍त तक्रारीनुसार लाचलुचपत विभागाने आज (१३ जानेवारी) सकाळी सापळा रचत कनिष्ठ लिपीत वसंत बारी यास पंचायत समिती कार्यालयात (Jamner Panchayat Samiti) तीन हजार रूपयांची लाच घेतांना रंगेहाथ ताब्‍यात घेतले. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलीस उपअधिक्षक शशिकांत पाटील, पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील आदींनी सदरची कारवाई केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com