एरंडोल तालुक्यात अतिवृष्टी; अंजनी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग

एरंडोल तालुक्यात अतिवृष्टी; अंजनी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग
heavy rain
heavy rain

एरंडोल (जळगाव) : जळगाव जिल्‍ह्यातील काही भागात रात्रीच्‍या सुमारास अवकाळी पाऊस झाला. यात एरंडोल तालुक्यात आज पहाटे अतिवृष्टी झाली. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तालुक्यात सर्वत्र मुसळधार पाउस झाल्यामुळे अंजनी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे प्रकल्पाच्या तीनही दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आल्याने नदीला पूर आला. (jalgaon-news-Heavy-rains-in-Erandol-taluka-Discharge-of-water-from-Anjani-project)

heavy rain
चक्‍क दारु दुकान परवानगीसाठी ग्रामसभेत पाच अर्ज

एरंडोल तालुक्यात आज पहाटे दीड ते दोन वाजेच्या सुमारास सर्वत्र अतिवृष्टी झाली. अवकाळी पडलेल्या पावसामुळे कापूस, कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अंजनी प्रकल्पात पाण्याची आवक वाढल्यामुळे प्रकल्पातील जलसाठा शंभर टक्के झाला. प्रकल्पातील पाण्याची पातळी २२५.९१ मीटर झाल्यामुळे आज सकाळी साडेसात वाजता प्रकल्पाचे तीनही दरवाजे पाच सेंटीमीटर उघडण्यात आल्यामुळे प्रकाल्पातीन सुमारे सातशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग अंजनी नदीच्या पात्रात करण्यात आला. प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे अंजनी नदीला पूर आल्यामुळे नागरिकांनी पूर पाहण्यासाठी नदीकाठी गर्दी केली होती.

तीन तासात १०१ मीमी पाऊस

एरंडोल तालुक्यात तीन तासात एरंडोल येथे १०१, कासोदा येथे ६६, रिंगणगाव येथे ८१ तर उत्राण येथे ३५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पहाटे अचानक जोरदार पाउस सुरु झाल्याने नागरिकांची एकाच धांदल उडाली. पावसामुळे कापूस आणि कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com