Silver Price: साधा गुरू पुष्पामृतचा मुहूर्त; चांदीत एक हजारांची घट, सोने मात्र तीनशेने महागले

साधा गुरू पुष्पामृतचा मुहूर्त; चांदीत एक हजारांची घट, सोने मात्र तीनशेने महागले
Silver Price Today, Gold Price Today, Jalgaon News
Silver Price Today, Gold Price Today, Jalgaon NewsSaam tv

जळगाव : गुरूपुष्पामृताच्‍या मुहूर्तावर सोने, चांदी खरेदी शुभ मानली जाते. हा मुहूर्त साधायची चांगली संधी गुंतवणूकदारांसाठी आली आहे. कारण येत्‍या गुरूवारी (ता.३०) गुरूपुष्‍पामृत योग असून या पार्श्वभूमीवर चांदीच्या दरात (Gold And Silver) एक हजारांची घट झाली आहे. मात्र सोन्याच्या दरात तिनशे रूपयांची वाढ झाली आहे. (jalgaon news Guru Pushpamrut Silver price three thousand down)

Silver Price Today, Gold Price Today, Jalgaon News
दीड लाख रुपयाचा पकडला गुटखा; पोलिसांची धडक कारवाई

मे महिन्यात चांदीचा दर ६९ हजार (प्रतिकिलो) गेला (Jalgaon News) होता. मात्र नंतर थेट चार हजारांची घसरण होऊन चांदी ६५ हजारापर्यंत खाली आली होती. सोन्याच्या दरात एका तोळ्यामागे ३५० रुपयांची घसरण झाली होती. १४ मेस सोन्याचा दर ५० हजार ६००, चांदी ६१ हजारांवर होती. २३ मेस सोन्याचा दरात ९०० रूपयांची वाढ होऊन ते ५१ हजार ५०० वर गेले. तर चांदीच्या दरात तीन हजारांची वाढ होऊन ६४ हजारांवर गेली. तीस मेस सोने ५१ हजार ७०० तर चांदी ६३ हजारांवर गेली. अकरा जूनला सोने ५२ हजार तर चांदी ६३ हजार ५०० एवढे होती. सोमवारी (ता. २७) सोन्याचा दर ५१ हजार २०० प्रतितोळा, तर चांदीचा दर ६२ हजार ५०० (किलो) असा आहे. राज्यातील राजकारणाचाही फटका सुवर्ण बाजाराला बसण्याची शक्यता आहे. राज्यातील सत्तेचे राजकारण असेच सुरू राहिल्यास (Gold) सोने, चांदीचे दर कमी होवू शकतात, असे सराफ व्यावसायिक सांगतात.(Silver Price Today)

सोने, चांदीचे दर असे (जीएसटीविना)

तारीख--सोने (प्रतितोळे)--चांदी (प्रतिकिलो)

२१ जून--५१ हजार ३००--६३ हजार ५००

२२ जून--५१ हजार--६२ हजार ५००

२३ जून--५१ हजार--६२ हजार ५००

२४ जून--५० हजार ९००--६१ हजार ५००

२७ जून--५१ हजार २००--६२ हजार ५००

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com