जळगाव जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांच्या जानेवारीत निवडणुका

जळगाव जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांच्या जानेवारीत निवडणुका
Election
Election

जळगाव : जिल्हा बँक संचालक मंडळासाठी आगामी महिन्यात २१ नोव्हेंबरला निवडणूक होत आहे. त्यापाठोपाठ २३ ऑक्टोबरपूर्वी मुदत संपलेल्या बारा बाजार समित्यांच्या संचालक मंडळाची निवडणूक घेण्याचा निर्णय राज्य सहकार विभागाने घेतला आहे. त्यासाठी मतदारयाद्या व निवडणूक कार्यक्रमाची घोषणाही झाली असल्याची माहिती सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी दिली. (jalgaon-news-Election-of-12-market-committees-in-Jalgaon-district-in-January)

राज्यासह जिल्ह्यात बाजार समित्यांची पाच वर्षांची मुदत २०२० मध्येच संपुष्टात आली आहे. काही बाजार समित्यांना दोन ते तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. असे असले तरी, संसर्ग प्रादूर्भाव पाहता, सहकार विभागाने निवडणुका लांबणीवर टाकून संचालक मंडळांना मुदतवाढ देऊन काही ठिकाणी प्रशासक नेमण्यात आले होते. दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट संपुष्टात येऊन तिसऱ्या लाटेची शक्यताही मावळल्याने सहकार विभागाने निवडणुका घेण्यास अनुकूलता दर्शविली असून, स्थगित झालेल्या वा पुढे ढकलण्यात आलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचा राज्य सरकार व सहकार खात्याकडून निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांच्या निवडणुकीचा मार्ग या निर्णयाने मोकळा झाला आहे.

२३ ऑक्‍टोंबरपर्यंत मुदत संपणाऱ्या बाजार समिती

बाजार समित्यांची मुदत यापूर्वीच संपुष्टात आली असून, सहकार विभागाच्या निर्णयानुसार २३ ऑक्टोबर २०२१ पर्यंत मुदत संपणाऱ्या व त्यापूर्वी मुदत संपलेल्या सर्वच बाजार समित्यांच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. त्यासाठी ११ ते २२ ऑक्टोबर सहकारी संस्था, गटविकास अधिकारी यांच्याकडून सदस्य सूची मागवून २५ ऑक्टोबरपर्यंत समिती सचिवांकडे प्रारूप यादीसाठी सदस्य सूची पाठवावी. बाजार समिती सचिवांनी ३ नोव्हेंबरपर्यंत प्रारूप मतदारयादी तयार करून पाठवावी. त्यानुसार १० नोव्हेंबरला प्रारूप मतदारयाद्या प्रसिद्ध करण्याच्या सूचना आहेत. १० ते २२ नोव्हेंबरदरम्यान प्रारूप मतदार यादीवर आक्षेप हरकती, तर अंतिम मतदारयादी ६ डिसेंबरला जाहीर होईल.

Election
बंदला गालबोट..भाजप– महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले

असा आहे कार्यक्रम

- निवडणूक जाहीर करणे- १६ डिसेंबर

- नामनिर्देशनपत्र विक्री, स्वीकृती- १६ ते २२ डिसेंबर

- अर्जांची छाननी- २३ डिसेंबर

- वैध, अवैध ठरविणे- २४ डिसेंबर

- माघारी- ७ जानेवारी २०२२

- अंतिम उमेदवारांना चिन्हवाटप- १० जानेवारी

- मतदान- १७ जानेवारी

- मतमोजणी- १८ जानेवारी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com