भटक्या कुत्र्यांचा हैदोस; दोन महिन्यात १ हजारावर नागरिकांचे तोडले लचके

भटक्या कुत्र्यांचा हैदोस; दोन महिन्यात १ हजारावर नागरिकांचे तोडले लचके
Dog Bite
Dog BiteSaam tv

जळगाव : जळगाव शहरासह जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातला असून मागील महिन्यात तब्बल १ हजारावर नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची माहिती समोर आली आहे. (jalgaon news Dog bites on one thousand citizens in two months)

Dog Bite
हृदयद्रावक..मजूरीला गेलेल्‍या आईला दिसली फक्‍त मुलाची राख; झोपडीला अचानक आग

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या इंजेक्शन विभागात झालेल्या नोंदीनुसार फेब्रुवारी महिन्यात एकूण ५०४ व्यक्तींवर कुत्रा चावल्यामुळे उपचार करण्यात आले आहे. यात ३२६ पुरुष, ९१ महिला तर ८७ लहान बालकांचा समावेश आहे. मार्च महिन्यात एकूण ५३७ व्यक्तींना कुत्र्यांनी चावा घेतला असून यात ३४८ पुरुष, ८७ महिला तर १०२ लहान बालकांचा समावेश आहे. यासोबतच याच दोन महिन्यात १९ जणांवर मांजर, ७ जणांवर उंदीर, एकाला खारीने तर ४ जणांना मानवाने चावा घेतल्यामुळे उपचार करण्यात आले आहेत.

जळगाव शहरात प्रमाण अधिक

उपचार घेणार्‍यांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे जळगाव (Jalgaon) शहरातील आहेत. त्यामुळे नागरिकांनी त्यांच्यासह लहान मुलांना भटक्या व पाळीव प्राण्यांपासून सावध ठेवावे. प्राणी चावल्यास तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी यावे. कुत्रा चावल्यावर जखम झाकू नये. स्वच्छ व भरपूर पाण्याने जखम धुवून घ्या, त्यानंतर रुग्णालयात उपचारासाठी यावे, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ.विजय गायकवाड यांनी केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com