शेत रस्त्याचा वाद अन्‌ तहसीलदारांचा बैलगाडीतून प्रवास

शेत रस्त्याचा वाद अन्‌ तहसीलदारांचा बैलगाडीतून प्रवास
तहसीलदार
तहसीलदार

धरणगाव (जळगाव) : मौजे बोरगाव खु. (ता. धरणगाव) येथील शेतकरी स्वप्निल मुरलीधर पाटील यांचा शेतरस्ता गोपीचंद जामु पाटील यांनी अनधिकृतपणे अडवल्याची तक्रार तहसीलदार यांच्याकडे आली होती. सदर तक्रारीचा न्यायनिवाडा करण्यासाठी तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी रस्ता खराब असल्याने चक्क बैलगाडीतून प्रवास करीत रस्त्याची वस्तुस्थिती शेतकऱ्यांकडून जाणून घेतली. (jalgaon-news-dharangaon-Farm-road-dispute-and-tehsildar's-journey-in-bullock-cart)

मौजे बोरगाव खु. येथील शेतकरी स्वप्नील मुरलीधर पाटील यांचा शेत रस्ता गोपीचंद जामू पाटील यांनी अनधिकृतरित्‍या बंद केल्याची तक्रार तहसीलदार नितीन कुमार देवरे यांच्याकडे प्राप्त झालेली होती. सदर प्रकरण मामलेदार कोर्ट अधिनियम अंतर्गत सुरू करण्यात आले. त्यासाठी प्रत्यक्ष रस्ता पाहणी करणे गरजेचे होते. रस्ता पाहणीसाठी तहसीलदार गेले असता या रस्त्यावर दुचाकी वाहनाने देखील जाऊ शकत नव्हते. मात्र शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेता तहसीलदार देवरे यांनी चक्क बैलगाडीतून प्रवास करीत रस्ता पाहणी केली. लवकरच कायदेशीर बाबी तपासून सामंजस्याने दोन्ही शेतकऱ्यांमधील रस्त्याचा वाद संपवण्यात येईल अशी चर्चा शेतकऱ्यांशी करण्यात आली. यामुळे उपस्थित शेतकरी देखील भारावून गेले व महसूल विभाग आणि अधिकारी देवरे यांचे कौतुक केले.

तहसीलदार
कापसाला भाव पण..शेतकरी हतबल; करताय कपाशी नष्‍ट

नोकरीचा केंद्रबिंदू शेतकरी

माझ्या नोकरीचा केंद्रबिंदूच शेतकरी असल्याचे व शेतकऱ्यांना रस्ताच नसेल तर ते शेती कशी कसतील म्हणून बैलगाडीत प्रवास करत त्यांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com