महामार्गावरील खड्डे बुजवण्याच्या कामावर चक्‍क ठाणेदारांचे लक्ष

महामार्गावरील खड्डे बुजवण्याच्या कामावर चक्‍क ठाणेदारांचे लक्ष
महामार्गावरील खड्डे बुजवण्याच्या कामावर चक्‍क ठाणेदारांचे लक्ष

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : चाळीसगाव- धुळे महामार्गाची अंत्यत दयनीय अवस्था झाली आहे. हा रस्ता जीवघेणा बनला आहे. या जीवघेण्या खड्ड्यांमधून मार्ग काढतांना वाहनधारकांची अक्षरशा त्रेधा उडत असतांना ठेकेदाराकडून मात्र थातूर मातूर काम करून खड्डे बुजवले जात आहेत. कायदा– सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणाऱ्या मेहूणबारे पोलीसांनी सामाजिक दायित्व निभावत रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी यापूर्वीही मदतीचा हात दिला असतांना व आताही खड्डे बुजवले जात असतांना सहाय्यक निरीक्षक पवन देसलेंनी रस्त्यावर जावून खड्डे चांगले बुजवले जात आहे की नाही याची माहिती घेतली. ठाणेदारांच्या या वॉचमुळे किमान खड्डे तरी चांगले बुजवले जातील अशी अपेक्षा आहे. (jalgaon-news-cjalisgaon-dhule-highway-work-wacth-police-officer-work)

चाळीसगाव ते धुळे महामार्गाची गेल्या तीन– चार वर्षापासून अक्षरशा धुळधान उडाली आहे. रोजच अपघात होतात अशी स्थिती आहे आतापर्यंत शेकडो अपघात होवून असंख्यांचा बळी गेला आहे. मात्र त्याकडे महामार्ग प्राधिकरणाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. महामार्गाच्या चौपदीकरणाचे काम मार्गी लागत नसल्याने केवळ डागडुजी सुरू आहे. तीन– चार वर्षात या मार्गावर खड्डे बुजवण्यासाठी कोट्यावधी रूपये खर्च करण्यात आले आहेत.

महामार्गावरील खड्डे बुजवण्याच्या कामावर चक्‍क ठाणेदारांचे लक्ष
कापसाला भाव पण..शेतकरी हतबल; करताय कपाशी नष्‍ट

रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता

रस्त्यांमध्ये इतके खड्डे झालेत की रस्त्यात खड्डा आहे, की खड्ड्यात रस्ता हेच कळत नाही. अपघाताच्या घडणाऱ्या घटना पाहता मेहूणबारे पोलीसांकडून वाहनधारक तसेच नागरीकांची सतत जनजागृती केली जाते. यापूर्वी या मार्गावरील अपघात रोखण्यासाठी मेहुणबारे पोलिसांनी खड्डे बुजवण्यास सहकार्य केले होते. मात्र सततच्या पावसामुळे ही वाहुन जावून पुन्हा खड्डे तयार झाले. आताही चाळीसगाव-धुळे रस्त्यावर खड्डे बुजवण्याचे काम सुरू असतांना ते थातूरमातूर होवू नये; यासाठी मेहूणाबारे पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी जातीने लक्ष घालत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com