रोडरोमिओला शिकविला धडा; विद्यार्थिनींनी दिला चपलेचा प्रसाद

रोडरोमिओला शिकविला धडा; विद्यार्थिनींनी दिला चपलेचा प्रसाद
Road Romio
Road RomioSaam tv

जळगाव : बोदवड तालुक्यातील येवतीच्या विद्यार्थिनींनी रोड रोमिओला चांगलाच चोप दिला. शाळेत जात असलेल्‍या विद्यार्थीनींची हा रोड रोमिओ रोज छेड काढत होता. आज सदर विद्यार्थिनींनी एकत्र येत रोड रोमिओला (Road Romio) च‍पलेचा प्रसाद देत चांगलाच चोप दिला. (jalgaon news bodwad road romio was slapped by the girl)

Road Romio
जळगावचे तापमान ४० अंशांवर; उन्‍हाच्‍या झळा झाल्‍या तीव्र

जामठी (ता.बोदवड) येथील (Bodwad) विद्यालयात आजुबाजुच्या खेड्यापाड्यावरून शिक्षण (Education) घेण्यासाठी शेकडो विद्यार्थी येत असतात मागील कित्येक दिवसांपासून रोडरोमिओ यांनी विद्यालय, महाविद्यालय तसेच क्लासेस, बसस्थानक आदी ठिकाणी मुलींना त्रास देत होता. यामुळे मुलींना रस्त्यावर येऊन बंदोबस्त करण्याची वेळ आली. त्यांनी निर्भिडपणे रोडरोमिओस बेदम चोप दिला.

पोलिसांच्‍या स्‍वाधिक

आज सकाळी सात वाजेची शाळा असल्याने विद्यार्थींनी शाळेत येत असतांनाच बेटावद खुर्द येथील बापू दुमाले याने विद्यार्थींनीस अडवुन छेड काढण्यास सुरूवात केली. विद्यार्थीनींनी रोजचाच त्रास असल्याने एकत्रीत होऊन या रोडरोमिओला चांगलाच धडा शिकवत चोप दिला. त्यानंतर पोलीसांना पाचारण करून बोदवड पोलीसांच्या (Police) स्वाधिन करण्यात आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com