Crime News: माझ्याशी बोल नाहीतर तुझ्या कुटुंबीयांना संपवून टाकेल; जामिनावर सुटल्‍यावर पुन्हा काढली बालिकेची छेड

माझ्याशी बोल नाहीतर तुझ्या कुटुंबीयांना संपवून टाकेल; जामिनावर सुटल्‍यावर पुन्हा काढली बालिकेची छेड
Jalgaon Crime News
Jalgaon Crime NewsSaam tv

पाचोरा (जळगाव) : मुलीची छेड काढण्याच्या आरोपाखाली बालसुधार गृहात राहिला. परंतु, जामिनावर मुक्त झालेल्या अल्पवयीन युवकाने पुन्हा अल्पवयीन बालिकेस (Crime News) धमकावत छेड काढली. या प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी (Police) पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यास ताब्यात घेतले आहे. (Tajya Batmya)

Jalgaon Crime News
अचानक रेल्‍वे धावू लागली..पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे मुलाचा जीव वाचला; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

पाचोरा (Pachora) तालुक्‍यातील गावातील अल्पवयीन बालिका गावालगतच्या नदीवर कपडे धुण्यासाठी जात होती. या दरम्‍यान दुचाकीने पाठलाग करत गावाबाहेरच्या नदीपात्राजवळ तिला अडवून तू मला आवडते, जास्त भाव खाऊ नकोस; असे म्हणत व हात पकडून माझ्याशी बोलली नाही तर तुझ्या कुटुंबीयांना संपवून टाकेल अशी धमकी दिली. तसेच बालिकेस लज्जा वाटेल असे वर्तन केले.

घर गाठत सांगितले आई–वडीलांना

या प्रकाराने बालिका प्रचंड घाबरली. तिने आपली सुटका करून घेत घर गाठत झाला प्रकार आई– वडिलांना सांगितला. त्या आधारे पीडितेच्या आई– वडिलांनी लोहारा पोलीस दुरक्षेत्र गाठून तक्रार दिली. हा प्रकार कळताच लोहारा व कळमसरा येथील हिंदवी संघटनेचे अनेक कार्यकर्ते एकत्रित आले. त्यामुळे तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली. पोलीस पाटील महेंद्र शेळके यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना याबाबत कल्पना दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीनुसार अल्पवयीन युवकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com