मुलीचे दप्‍तरासह पलायन; पसार होण्यापूर्वीच प्रेमीयुगुल ताब्यात

मुलीचे दप्‍तरासह पलायन; पसार होण्यापूर्वीच प्रेमीयुगुल ताब्यात
Jalgaon News
Jalgaon NewsSaam tv

अमळनेर (जळगाव) : धुळ्याहून सुरतकडे पसार होण्याच्या तयारीत असलेल्या प्रेमीयुगुलाला रेल्वे सुरक्षा बलाच्या सतर्कतेने ताब्यात घेऊन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. विशेष म्हणजे या युगुलातील मुलगी ही अल्पवयीन आहे. (jalgaon news amalner railway station love couple custody before passing)

Jalgaon News
Womens Day: ‘ती’ मुलासारखी भक्कमपणे उभी; आई– वडीलांना जाणवू दिली नाही कमी

अमळनेर (Amalner) रेल्वेस्थानकावर रविवारी (ता. ६) दुपारी एक तरुण व संबंधीत मुलगी प्रतीक्षा कक्षात संशयितरित्या बसलेले आढळून आले. सुरक्षा बलाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कुलभूषणसिंह चौहान, (Police) पोलिस कर्मचारी सुभाष कुमार, नीलम बैरागी हे स्थानकावर गस्त घालत असताना त्यांना संशय आला. म्हणून त्यांची विचारपूस केली असता मुलीने तिचे नाव चुकीचे सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी खाक्या दाखवून त्यांना पत्ता विचारला असता, त्यांनी धुळे (Dhule) येथील सांगितले.

व्हिडिओ कॉलवर पालकांनी ओळखले

सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ धुळे पोलिसांशी (Dhule Police) संपर्क साधला. धुळ्याचे पोलिस उपनिरीक्षक बी. एल. दतौजे यांनी आमच्या हद्दीतील मुलगी बेपत्ता असल्याचे सांगून मात्र नाव चुकीचे असल्याने त्यांनी खात्रीसाठी व्हिडिओ कॉल करायला सांगितला. योगायोगाने त्या मुलीचे पालक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी बसले होते. व्हिडिओ कॉलवर पालकांनी आपल्या मुलीला ओळखल्याने पोलिसांनी या दोघांना बसवून ठेवण्यास सांगितले. तिकडे मुलाचे पालक देखील त्याला शोधत होते. सुरक्षा बलाच्या पोलिसांनी मुलाच्या भावाला बोलावून घेतले. तर धुळे पोलिसांनी महिला पोलिस कर्मचारी माया ढोके यांना मुलीच्या नातेवाईकांसह अमळनेर येथे पाठवले.

मुलीचे शालेय दप्‍तरासह पलायन

मुलीने शाळेच्या दप्तरासह शनिवारपासून (ता. ५) धुळ्याहून पलायन केले होते. तिच्या पळून जाण्याने आईने धसका घेतल्याने ती आजारी पडली होती. प्रेमी युगुलाजवळ फक्त २०० रुपये होते. ते सुरत येथे जाण्याच्या तयारीत होते. अवघ्या १० मिनिटात सुरतकडे जाणारी रेल्वे येणार होती. सुरक्षा बलाने सतर्कता ठेवली नसती तर दोघे पळून जाण्यात यशस्वी ठरले असते. दोघांना आई- वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. पालकांनी अमळनेर रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com