Accident: भरधाव आयशर ट्रकची कालीपिलीला धडक; सहा प्रवाशी जखमी

भरधाव आयशर ट्रकची कालीपिलीला धडक; सहा प्रवाशी जखमी
Accident
AccidentSaam tv

जळगाव : जळगावकडून चोपड्याकडे जाणाऱ्या कालीपिली खासगी प्रवाशी वाहनाला आयशर ट्रकने समोरून धडक दिली. धानोरा गावाच्या पुढे देवगाव फाट्याजवळ झालेल्‍या या (Accident) अपघातात सहा जण जखमी झाले आहेत. सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. (Jalgaon News Accident)

Accident
आमदार राजेश पाडवींनी केला एसटीतून प्रवास; विद्यार्थ्यांशी संवाद साधत जाणून घेतल्‍या समस्या

जळगावहून (Jalgaon) विदगाव मार्गे चोपडा या मार्गावर कालिपील खासगी प्रवाशी वाहतुक सुरू आहे. याच दरम्‍यान जळगावकडून चोपड्याच्‍या (Chopda) दिशेने प्रवाशी नेत असलेल्‍या कालीपिलीला चोपड्याकडून भरधाव वेगाने येत असलेल्‍या आयशर ट्रकने धानोरा गावाच्या पुढे देवगाव फाट्याजवळ समोरून जोरदार धडक दिली. या धडकेत कालिपीलीचा समोरील भाग चेपला गेला आहे. यात सहा प्रवाशी जखमी झाले आहेत.

जखमी शासकिय रुग्णालयात दाखल

या धडकेत कालिपीलीमध्‍ये बसलेले शोभाबाई विनोद आढाळे (वय 30, रा. पिंप्राळा), श्रीराम रुपसिंग (वय 45), बन्सीलाल सुरसिंग (वय 35), घनश्याम आढळकर (वय 38, सर्व रा. धानोरा), नितीन सोनवणे (वय 38), मनोज गवळी (वय 35, रा. शनिपेठ) हे जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com