आंतरराष्ट्रीय मोबाईल चोर टोळी नागपूर पोलिसांकडून जेरबंद!

नागपूर पोलिसांनी एका आंतरराष्ट्रीय मोबाईल चोरणाऱ्या टोळीला नेपाळ बॉर्डर वरून अटक केलीय. हि टोळी चोरीचे मोबाईल नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेश व भूतान सारख्या देशात नेऊन विकायची.
आंतरराष्ट्रीय मोबाईल चोर टोळी नागपूर पोलिसांकडून जेरबंद!
आंतरराष्ट्रीय मोबाईल चोर टोळी नागपूर पोलिसांकडून जेरबंद!SaamTvNews

- मंगेश मोहिते

नागपूर : नागपूर च्या धरमपेठ परिसरात वन प्लस मोबाईल शॉपी फोडून त्या ठिकाणी असलेले वन प्लस कंपनीचे 27 लाख रुपये किमतीचे मोबाईल चोरी करण्यात आले होते. पोलिसांनी या घटनेचा तपास तांत्रिक पद्धतीने सुरू केला असता आरोपी इंदोर मध्ये असल्याचं त्यांना कळले. मात्र, पोलीस तिथे पोहचेपर्यंत ते बिहारच्या चंपारण्य मध्ये पोहचले. नेपाळ सीमा लागून असल्याने त्यांचा नेपाळ मध्ये वावर होता. मात्र, या टोळीतील दोन जणांना बिहार पोलिसांनी एका गुन्ह्यात अटक केली व याच कालावधीत नागपूर पोलीस सुद्धा तिथे पोहचले.

हे देखील पहा :

नागपूर पोलिसांनी मोठ्या मेहनतीने या आरोपींची कस्टडी मिळवली, त्यांच्या बाबत अधिक तपास केला असता ही मोठी टोळी असून देशाच्या वेगवेगळ्या भागात ही टोळी महागडे मोबाईल चोरी करते आणि ते नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेश व भूतान या देशात जाऊन त्याची विक्री करते. महत्वाचं म्हणजे ही टोळी ज्या शहरात चोरी करते त्या शहरातील नेटवर्क चा वापर करत नाही.

आंतरराष्ट्रीय मोबाईल चोर टोळी नागपूर पोलिसांकडून जेरबंद!
आरोग्य विभागाकडून पहिली ते सातवी चे वर्ग सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी

हे चोर स्वतःच्या डोंगलच्या माध्यमातून फेसबुक मेसेंजर वरून एकमेकांना कॉन्टॅक्ट करतात त्यामुळे यांचे लोकेशन सापडणे कठीण जाते. आता या टोळीतील दोन आरोपी पोलिसांच्या हाती लागले असून बाकीच्यांचा शोध पोलीस घेत आहेत. नागपुरातील मोबाईल शॉपी प्रकरणात याना अटक झाली असली तरी देशातील वेगवेगळ्या मोठ्या शहरात यांच्यावर गुन्हे दाखल असून हे फरार आहेत. मात्र आता या टोळीचा संपूर्ण पर्दाफाश नागपूर पोलीस करणार आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com