2016 मधील आंदोलन प्रकरणी नितेश राणेंसह 41 जणांची निर्दोष मुक्तता

या आंदालनावेळी मोठा राडा झाला होता त्यानंतर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हे दाखल करून राणेंना अटक केली होती.
Nitesh Rane
Nitesh RaneSaam TV
Published On

विनायक वंजारे -

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील (Sindhudurg District) डंपर चालक-मालक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 4 मार्च 2016 रोजी आंदोलन करण्यात आले होते त्यावेळी आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रशासन दखल घेत नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून आंदोलन व तोडफोड केली होती.

या आंदालनावेळी मोठा राडा झाला होता त्यानंतर या सर्वांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हे दाखल करून अटक केली होती त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली होती याबाबत येथील जिल्हा न्यायालयात खटला सुरू होता.

Nitesh Rane
ह्रदयद्रावक! दीड वर्षाच्या चिमुकल्याला टेम्पोनं चिरडलं; अपघाताची घटना CCTV मध्ये कैद (पहा Video)

यावेळी 20 साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली होती यामध्ये तत्कालीन पोलीस अधीक्षक तत्कालीन जिल्हाधिकारी यांचीही साक्ष नोंदवण्यात आली होती. जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. बी रोटे यांनी आज निर्णय देताना आमदार नितेश राणे, सतीश सावंत, दत्ता सामंत यांच्यासह 41 जणांची निर्दोष मुक्तता केली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com