गिरीश कुबेरांवरील शाईफेक ही ऍक्शनला आलेली रिऍक्शन - प्रवीण दरेकर

अगोदर शिवसेनेचा केंद्रबिंदू हा बाळासाहेब ठाकरे Balasaheb Thackeray आणि हिंदुत्व होत, मात्र, आता शिवसेनेचे केंद्रबिंदू हे गांधी घराणं झालेलं आहे. त्यामुळे शिवसेना आता गांधी घराण्याभोवती पिंगा घालताना दिसून येत आहे.
गिरीश कुबेरांवरील शाईफेक ही ऍक्शनला आलेली रिऍक्शन - प्रवीण दरेकर
गिरीश कुबेरांवरील शाईफेक ही ऍक्शनला आलेली रिऍक्शन - प्रवीण दरेकरSaamTV
Published On

सोलापूर : काँग्रेस - राष्ट्रवादी बरोबर सरकार स्थापन केल्यामुळे शिवसेनेचा केंद्रबिंदू बदलला आहे. अगोदर शिवसेनेचा केंद्रबिंदू हा बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि हिंदुत्व होत, मात्र, आता शिवसेनेचे केंद्रबिंदू हे गांधी घराणं झालेलं आहे. त्यामुळे शिवसेना आता गांधी घराण्याभोवती पिंगा घालताना दिसून येत आहे. अशी टीका विधानपरिषदचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी सेनेवरती केली आहे. तसेच गिरीश कुबेरांवरील हल्ला ही ऍक्शनला रिऍक्शन होती असं देखील दरेकर म्हणाले आहेत.

हे देखील पहा -

शिवसेना (Shivsena) या अगोदरच काँग्रेस बरोबर गेली आहे. आता ती युपीएत (UPA) गेली तर कांही मोठा फरक पडणार नाहीये. सत्तेसाठी काँग्रेस - राष्ट्रवादीला भागीदार बनवणाऱ्या शिवसेनेने हिंदुत्व आणि मराठी माणूसाला तिलांजली दिली आहे.

सरकार अंतरविरोधातून 100% कोसळणार -

तसेच महाविकास आघाडी सरकार हे दीर्घकाळ टिकू शकतं नाही. सरकारमध्ये असणारा विसंवाद हा प्रशासनामध्ये सुद्धा आहे. त्यामुळे राज्याचा एक इंच ही पुढे जात नाही, त्यामुळे आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटलेली आहे. तीन पक्षांचे हे सरकार आपापल्यातील विसंवाद आणि अंतरविरोधातून 100% कोसळणार आहे.

गिरीश कुबेरांवरील शाईफेक ही ऍक्शनला आलेली रिऍक्शन - प्रवीण दरेकर
'पवार कुटुंब राज्यातील OBC समाजाचा कर्दनकाळ'

दरम्यान, सावरकरांवरच (Savarkar) महाविकास आघाडीच्या नेत्यांचे प्रेम हे बेगडी आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) साहित्यसंमेलनाला दुरून नमस्कार केला आहे. विचारवंत, पत्रकार, लेखकांच्या लेखनीने समाजाला दिशा मिळत असते, त्यामुळे त्यांनी लोकभावनेचा आदर केला पाहिजे. जर अशा लोकांना बेमालुमपणे समाजाच्या भावना बिघडवल्या, श्रद्धास्थानांवर लिहिलंत तर ऍक्शनला रिऍक्शन मिळते, त्यामुळे गिरीश कुबेरांवरील (Girish Kuber) हल्ला ही ऍक्शनला रिऍक्शन होती. अशा स्वरूपात ती करायला नको होती, मात्र ती ऍक्शनला आलेली रिऍक्शन होती, असं म्हणतं प्रवीण दरेकरांनी संभाजी ब्रिगेडने (Sambhaji Brigade) केलेल्या कृतीच अप्रत्यक्षपणे समर्थन केल आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com