अवैध गर्भपात होत असल्यास माहिती द्या अन् एक लाख रुपये मिळवा...

जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर वाढवण्याच्या अनुषंगानं प्रशासनाकडून एक पाऊल पुढे
अवैध गर्भपात होत असल्यास माहिती द्या अन् एक लाख रुपये मिळवा...
अवैध गर्भपात होत असल्यास माहिती द्या अन् एक लाख रुपये मिळवा...Saam TV

बीड जिल्ह्यात स्त्री जन्मदर घटत असल्याने, जिल्हा आरोग्य विभागाने एक पाऊल पुढे टाकले आहे. जिल्ह्यात कुठे अवैध गर्भपात होत असेल, तर ती माहिती आमच्या विभागाला द्या. जर ती माहीती खरी आढळली, तर माहिती देणाऱ्यास एक लाख रुपयांचं बक्षीस देऊ. असे आवाहन जिल्ह्यातील स्त्री जन्मदर पुन्हा एकदा वाढवा यासाठी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे यांनी केले आहे. तर जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर पुन्हा एकदा घटत असल्याची माहिती, पीसीपीएनडीटी कायद्याच्या अशासकीय सदस्या डॉ. आशा मिरगे यांनी, बीडच्या (Beed) जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेतून दिली होती. (Number of girls in Beed decreased)

अवैध गर्भपात होत असल्यास माहिती द्या अन् एक लाख रुपये मिळवा...
कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या मुलीवर चित्रपट; नेटफ्लिक्सने दिले लाखो डॉलर

दरम्यान त्यानंतर आरोग्य प्रशासन कामाला लागलं आहे. तर याविषयी सीएस डॉ. सुरेश साबळे म्हणाले, की यावर उपाय योजना म्हणून, बीड जिल्हा आरोग्य प्रशासनाने एक पाऊल पुढं टाकलंय. 2012 - 13 मध्ये याखाली आपल्या बीड जिल्ह्याचा जन्मदर होता. 797 म्हणजे 800 पेक्षा कमी होता आणि तो वाढत जाऊन 2019 - 20 मध्ये तो 961 झाला. म्हणजे 1 हजार मुलांच्या मागे 961 मुलींचा जन्मदर होता. याचा अर्थ असा आहे, की मुलींचा जन्मदर वाढत गेलेला आहे.

फक्त मागच्या वर्षी आहे 947 झाला आणि 2020 - 21 मध्ये तो डिसेंबर पर्यंत 928 झाला आहे. जर आपण मागच्या वर्षीचा आलेख बघितला, तर आपला जन्मदर वाढलेला आहे. दरम्यान जर कुठे अवैध गर्भपात होत असेल किंवा लिंगनिदान होत असेल, तर त्याची माहिती आम्हला द्या, सदरील व्यक्तीचे नाव गुपित ठेवलं जाईल, आणि जर सदर माहिती खरी असेल तर शासनातर्फे माहिती देणाऱ्या व्यक्तीस 1 लाख रुपयाचे बक्षीस दिले जाईल. असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी दिलीय.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com