Family Violence In State: चिंताजनक! कौंटुबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ; मुंबई पहिल्या तर नागपूर दुसऱ्या स्थानावर

राज्यातील वाढत्या कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यांची संख्या चिंताजनक असून कुटुंबसंस्थेला हानिकारक ठरत आहेत.
Family Violence In Maharashtra
Family Violence In MaharashtraSaamtv
Published On

Family Violence In Maharashtra: राज्यात महिलांवरील लैंगिक अत्याचार आणि अश्लील चाळे, विनयभंगाचे गुन्हे वाढले असतानाच आता कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यांमध्ये मुंबई पहिल्या तर नागपूर-पुणे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहे. पोलीस विभागाच्या संकेतस्थळावरून ही माहिती पुढे आली आहे. (Domestic Violence Increase Maharashtra)

Family Violence In Maharashtra
Dhule Corporation News: आयुक्तांनाच हटवा; माजी स्थायी समिती सभापतींचे ठिय्या आंदोलन

याबाबत अधिक माहिती अशी की, सध्या राज्यात महिलांवरील (Domestric Controversy) अन्याय-अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यात सर्वाधिक घटना कौटुंबिक हिंसाचाराच्या आहेत. क्षुल्लक कारणावरून घरातील वाद-विवाद वाढत आहेत. टीव्ही-मोबाईलचा (Mobile) वापर वाढल्यामुळे घर आणि संसाराकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र समोर आहे.

अनेक कुटुंबात मुलांचे लग्न झाल्यानंतर घरात कुरबूर वाढत आहे. लहान-सहान वादातून सून किंवा आईवडील पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदवित आहेत. सध्या राज्यातील कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना मुंबईत (Mumbai) वाढल्या आहेत. (Latest Crime News)

Family Violence In Maharashtra
Dhule News : गोरगरिबांच्या ताटातील रेशनवर दुकानदाराचा डल्ला ? पूरवठा विभागावर ग्रामस्थ नाराज, आंदाेलनाच्या भूमिकेत

मुंबईत कौटुंबिक हिंसाचाराचे २१८ गुन्हे दाखल आहेत तर नागपूर शहरात कौटुंबिक हिंसाचाराचे ११८ गुन्हे दाखल आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ४५ गुन्हे अधिक आहेत. पुण्यात सर्वात कमी ५४ गुन्हे दाखल आहेत. मात्र, पुणे पोलिसांनी सर्वाधिक २८ आरोपींना कौटुंबिक हिंसाचार केल्याप्रकरणी अटक केली आहे. राज्यातील वाढत्या कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यांची संख्या चिंताजनक असून कुटुंबसंस्थेला हानिकारक ठरत आहेत. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com