राज्यात अशा परिस्थितीत राष्ट्रपती राजवट लागू करणं गरजेचं- नारायण राणे

सत्तेत आहेत तेच धिंगाणा घालत आहेत.
Narayan Rane
Narayan RaneSaam Tv
Published On

पुणे: राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था नाही तर फक्त हुकूमशाही चाली आहे. सत्तेत आहेत तेच धिंगाणा घालत आहेत. पोलीस आणि शिवसैनिक एकत्र येवून सूड उगवण्याचे काम करत आहेत. राज्यात (state) खून होत आहेत, दरोडे पडत आहेत. शेतकऱ्यांचे (farmers) प्रश्न सुटले जात नाही. यामुळे अशा काळामध्ये राज्यात राष्ट्रपती (President) राजवट येणे गरजेचे आहे, असे मत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी व्यक्त केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री या निवास्थानाबाहेर हनुमान चालिसाचे पठण करण्यासाठी आलेल्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यावरून नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्याबरोबरच शिवसेनेवर (ShivSena) कडाडून टीका केली आहे. या देशात लोकशाही आहे, कोणी हनुमान चालिसा पठण करण्यासाठी येत असेल विरोध का? याबरोबरच एका व्यक्तीला एक कायदा आणि दूसऱ्याला दूसरा कायदा का? असा सवाल यावेळी नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे.

हे देखील पहा-

नारायण राणे पुढे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचा कोणावर देखील अंकूश नाही. नवनीत राणा या खासदार आहेत तर रवी राणा (Ravi Rana) हे आमदार आहेत. मुख्यमंत्री सक्षम आहेत का? त्यांना राज्याचे प्रश्न माहित नाही. त्यांचे शेवटचे भाषण अंतिम आठवडा प्रस्तावावार झाले आहे. पण हे भाषण कलानगरच्या नाक्यावरच्या भाषणासारखे होते. त्यांनी महाराष्ट्राला १० वर्ष पाठीमागे नेले आहे. ८९ हजार कोटी तूट असून राज्याची व्यवस्था पूर्ण बिघडली आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून राज्यात राजकीय वातावरण चांगलच तापले आहे.

Narayan Rane
धक्कादायक! मुलीला सासरी न पाठवल्याचा राग; जावयाने केली सासऱ्याची हत्या

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवले नाही तर मशिदींसमोर हनुमान चालिसाचे पठण करू असे म्हटले होते. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवास्थानाबाहेर येऊन हनुमान चालिसाचे पठण करणार असे आव्हान दिले होते. यानुसार राणा दाम्पत्य शुक्रवारी मुंबईमध्ये आले होते. परंतु, शिवसैनिकांनी यावेळी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर राणा दाम्पत्याने आपला निर्णय मागे घेतला आहे.

यानंतर या दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला असून त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. खार पोलिसांनी काल त्यांना अटक केल्यावर भाजप नेते किरीट सोमय्या हे राणा दाम्पत्याला भेटण्यासाठी गेले होते. परंतु, शिवसैनिकांनी यावेळी त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. यामुळे राज्यात वातावरण सध्या चांगलच तापले आहे. हा मुद्दा पकडून नारायण राणे यांनी राष्ट्रपती राजवट लागू व्हावी अशी मागणी यावेळी केली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com