भंडाऱ्यात पुन्हा कांग्रेस-भाजपच्या फुटीर गटाने मारली बाजी

आज भंडारा जिल्हा परिषदेच्या (Bhandara) चार विषय समितीच्या सभापतींची निवडणूक पार पडली असून या निवडणुकीत पुन्हा कांग्रेस-भाजपच्या फुटीर गटाने बाजी मारली आहे.
Congress/BJP
Congress/BJPSaam TV
Published On

भंडारा : आज भंडारा जिल्हा परिषदेच्या (Bhandara) चार विषय समितीच्या सभापतींची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत पुन्हा एकदा कांग्रेस आणि भाजपच्या फुटीर गटाने बाजी मारली असून या चारही पदावर त्यांनी ताबा मिळविला आहे. रमेश पारधी (काँग्रेस), मदन रामटेके (काँग्रेस), स्वाती वाघाये (काँग्रेस) राजेश सेलोकर (भाजप फुटीर गट) यांनी निवडणूक जिंकून नवनिर्वाचित सभापती पदाची माळ गळ्यात पाडून घेतली आहे.

नुकतीच १० मे रोजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली त्यामध्ये काँग्रेस आणि भाजप (Congress And BJP) फुटीर गटाने बहुमत सिद्ध करत सत्ता स्थापन केली होती. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं होतं. काँग्रेसवरती मित्र पक्षाकडून टीका देखील करण्यात आली होती. अशातच आज महत्वपूर्ण असलेल्या ४ विषय समितिची निवडणूक झाली. यामध्ये पुन्हा कांग्रेस आणि भाजपचे फुटीर गट एकत्र येत ४ विषय समितीवर कब्जा मिळविला आहे.

हे देखील पाहा -

दरम्यान, या विषय समितीच्या झालेल्या मतदानात कांग्रेस आणि भाजपच्या फुटीर गटाने २७ मतं मिळवत सभापती पद प्राप्त केलं असून राष्ट्रवादी आणि मुळ भाजपला मिळून केवळ २५ मतं पडल्याने त्यांना सभापती पदाला मुकावे लागले आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी व मुळ भाजप यांना दूर सारत ज्या प्रकारे काँग्रेस व भाजपच्या फुटीर गटाने सत्ता मिळविली तोच पॅटर्न सभापती पदाच्या निवडणुकीत वापरुन चारही सभापती पद मिळवली आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com