चिंताजनक ! भंडारा जिल्ह्यात कोरोना नव्हे तर वाढतोय 'हा'आजार

भंडारा जिल्ह्यात कोरोना सोबत आता हत्ती रोगाच्या रुग्णांत भरमसाठ वाढ झाली असून जिल्ह्यात तब्बल 3 हजार 234 रुग्ण आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत वाढ़ झाली आहे.
चिंताजनक ! भंडारा जिल्ह्यात कोरोना नव्हे तर वाढतोय 'हा'आजार
चिंताजनक ! भंडारा जिल्ह्यात कोरोना नव्हे तर वाढतोय 'हा'आजारSaamTv
Published On

भंडारा - भंडारा जिल्ह्यात कोरोना सोबत आता हत्ती रोगाच्या रुग्णांत भरमसाठ वाढ झाली असून जिल्ह्यात तब्बल 3 हजार 234 रुग्ण आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत वाढ़ झाली आहे. In Bhandara district, along with corona, the number of elephantiasis patients has increased dramatically

हे देखील पहा -

राज्यात 18 जिल्हे हत्तीरोग प्रवण जिल्हे म्हणुन ओळखले जात होते. मात्र, त्यापैकी 12 जिल्ह्यामध्ये सामुदायिक औषधोपचार मोहिम यशस्वी रित्या केल्याने हे जिल्हे हत्तीरोग मुक्त झाले आहेत. मात्र उरलेल्या 6 जिल्ह्यामध्ये हत्तीरोग निर्मूलन पंधरवडा मोहिम सुरु आहे.

यात भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश आहे. या 6 जिल्ह्यामध्ये मध्ये हत्तीरोग निर्मूलनासाठी जवळपास 1 कोटी 3 लाख औषध गोळ्यांचे वाटप केले गेले आहे. भंडारा जिल्ह्याच्या विचार केला असता जिल्ह्यात 7 ही तालुक्यात हत्तीरोगाचे रुग्ण आहेत.

चिंताजनक ! भंडारा जिल्ह्यात कोरोना नव्हे तर वाढतोय 'हा'आजार
पिंपरी-चिंचवड मध्ये 'कोयता भाई' !

भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यात सर्वाधिक 693 हत्तीरोगाचे रुग्ण आहेत. जिल्ह्यातील वातावरण हत्तीरोगाच्या मादीस पोषक असल्याने जिल्ह्यात रुग्ण वाढतअसल्याचे जिल्हा हत्तीरोग अधिकारी यांनी सांगितले आहे. तर सर्वांनी, शासनाने दिलेल्या हत्तीरोगाच्या गोळ्याचे सेवन करून रोगास निर्मुलन करण्यास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com