बदनापुरमध्ये जादूटोणा करून गुप्तधन काढणाऱ्यांचा पर्दाफाश; 3 जणांना अटक

जादु टोण्यासाठी वापरलं गेलेलं साहित्य पोलिसांकडून जप्त...
बदनापुरमध्ये जादूटोणा करून गुप्तधन काढणाऱ्यांचा पर्दाफाश; 3 जणांना अटक
बदनापुरमध्ये जादूटोणा करून गुप्तधन काढणाऱ्यांचा पर्दाफाश; 3 जणांना अटकलक्ष्मण सोळुंके
Published On

लक्ष्मण सोळुंके

जालना: जालन्यातील (Jalna) बदनापूर पोलिसांनी जादूटोणा करून गुप्तधन काढणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 3 जणांना अटक केली असून 3 जण फरार झाले आहेत. बदनापूर शहरातील एका वाड्यात हा गुप्तधन काढण्याचा प्रकार सुरू होता. पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन 3 जणांना अटक केली असून 3 जण फरार झाले आहेत.

हे देखील पहा-

पालघर मधील 45 वर्षीय धर्मदास गोपाल दास, भिवंडीमधील 46 वर्षीय विजय सहाणे, जालन्यातील धोपटेश्वर येथील 29 वर्षीय विजय दाभाडे, बदनापूरमधील जावेद खान महेबूब खान, साजिद खान महेबूब खान, फिरोज पठाण मोइनोद्दीन पठाण अशी या 6 आरोपींची नाव असून यातील तिघांना पोलिसांनी घटनास्थळाहुन अटक केली असून 3 जण फरार झाले आहेत.

बदनापुरमध्ये जादूटोणा करून गुप्तधन काढणाऱ्यांचा पर्दाफाश; 3 जणांना अटक
Breaking: लष्करी हेलिकॉप्टरचा अपघात; बिपिन रावत गंभीर, मृत्यांचा आकडा वाढला

बदनापूर मधील कुंभार गल्लीतील पडीत वाड्यामध्ये आरोपींनी जादूटोणा करून गुप्तधन काढण्याचा प्रकार सुरु केला होता. गुप्तधन काढण्यासाठी मंत्रोच्चार करून खड्डा खोदला जात होता.हे गुप्तधन काढत असतांना घटनास्थळी पोलिसांना पितळी तांब्या, 4 नारळ, कुंकू लावलेले लिंबू, एक लालसर रंगाचे कापड, खड्डा खोदण्यासाठी लोखंडी टिकास, पावडे असं साहित्य आढळून आलं असून हे साहित्य पोलिसांनी जप्त केलं आहे. तर तिघांना अटक केली असून तिघेजण फरार झाले आहे फरार झालेल्या तिघांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि ईतर अमानुष अनिष्ट आणि अघोरी प्रथा तसेच जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com