अवैधरित्या, विनापरवाना सुरू असलेला बायोडिझेल पंप महसूल विभागाने केला सील

नंदुरबार राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 वर शासनाचा महसूल बुडवून अवैधरित्या विनापरवाना सुरू असलेल्या बायोडिझेल पंपवर नवापूर महसूल विभागाने सील करून कारवाई केली आहे.
अवैधरित्या, विनापरवाना सुरू असलेला बायोडिझेल पंप महसूल विभागाने केला सील
अवैधरित्या, विनापरवाना सुरू असलेला बायोडिझेल पंप महसूल विभागाने केला सीलदिनू गावित
Published On

नंदुरबार: नवापुर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील सारवट गावाजवळ पलक बायो डिझेल अँड केमिकल हा पंप शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवून अवैधरित्या विनापरवाना सुरू होता. (Illegal, unlicensed biodiesel pump sealed by revenue department ab95)

हे देखील पहा -

सदरचा प्रकार नंदुरबारच्या सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करणवाल यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी लागलीस पलक बायो डिझेल पंप व जागेची तपासणी केली व सदरचा बायो डिझेल पंपचे पाच विक्री पॉईंट बंद करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार नवापुर तहसीलदार मंदार कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली बी. पी. सी. एल. कंपनीचे सहायक व्यवस्थापक अमित कुमार राय, पुरवठा निरीक्षक मिलिंद निकम, अक्षय लोहारे, तलाठी दासू गावित यांच्या पथकाने सदर बायो डिझेल अँड केमिकल पंप सील केला आहे. सदर बायोडिझेल पंप नवापुर तालुक्यातील प्रख्यात व्यवसायिक मनीष अग्रवाल यांच्याद्वारे शासनाचा महसूल बुडवून अवैधरित्या विनापरवाना सुरू केल्याने महसूल विभागाने पंप सील करुन केमिकलचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवले आहे.

अवैधरित्या, विनापरवाना सुरू असलेला बायोडिझेल पंप महसूल विभागाने केला सील
श्री श्री रविशंकर यांच्याशी संवादाची काही वेळात संधी

राष्ट्रीय महामार्गावर अवैधरित्या बायोडिझेलची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असल्याने परवानाधारक पेट्रोल पंप व्यावसायिकांचे नुकसान होत आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com