Aurangabad: विना मास्क फिराल तर तुमचं वाहन होणार 'ब्लॅक लिस्टेड'

अशा वाहनधारकांनी ई-चालनाची रक्कम भरली नसेल तर अशा वाहनधारकांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याचा निर्णय आरटीओने घेतला आहे.
Aurangabad: विना मास्क फिराल तर तुमचं वाहन होणार 'ब्लॅक लिस्टेड'
Aurangabad: विना मास्क फिराल तर तुमचं वाहन होणार 'ब्लॅक लिस्टेड'Saam TV

औरंगाबाद : कोरोना काळात मास्क न लावणं आपल्या आरोग्यासाठी धोक्याचंच आहे. आता जर चूक केली तर आरोग्यासोबतच आर्थिक भुर्दंड आणि मानसिक त्रासालासुद्धा तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे. कारण औरंगाबादमध्ये विनामास्कचा दंड न भरल्यास तुमचं वाहन ब्लॅक लिस्टमध्ये टाकलं जाणार आहे. त्यामुळे कोरोना होऊ नये आणि फुकटचा दंड बसू नये म्हणून मास्क लावण्याची सवय तरी करा.

ओमिक्रॉनमुळे (Omicron Variant) कोरोनाची (Corona) तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यात आता पुन्हा प्रत्येकांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. शासनाकडून खबरदारी घेतली जात असताना काही निर्बंधही लावले जात आहेत. तरीही लोक कोरोना प्रतिबंधात्मक नियामचं पालन करीत नाहीत. त्यामुळे औरंगाबाद महापालिकेडून कडक कारवाई सुरू आहे. आता तर महापालिकेच्या पथकांकडून विनामास्क फिरणाऱ्या वाहनधारकांची छायाचित्रे आरटीओकडे पाठवली जात आहेत. अशा वाहनधारकांनी ई-चालनाची रक्कम भरली नसेल तर अशा वाहनधारकांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याचा निर्णय आरटीओने घेतला आहे.

Aurangabad: विना मास्क फिराल तर तुमचं वाहन होणार 'ब्लॅक लिस्टेड'
काकाने अपहरण करुन 11 वर्ष केला बलात्कार; लग्न न केल्यास अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी

औरंगाबाद शहरात (Aurangabad) विनामास्क वाहनधारकांची संख्या वाढत आहे. यामुळे मनपाने अशांवर कारवाई करण्यासाठी आरटीओची मदत घेतली आहे. विनामास्क वाहनधारकांचे फोटो आरटीओकडे पाठवण्यात येत आहेत. आरटीओंना प्राप्त झालेल्या वाहनधारकांना आरटीओ कार्यालयांकडून ई- चालान पाठवण्यात येत होते. मनपाचे पथक दररोज ३०० ते ४०० विनामास्क वाहनधारकांचे फोटो आरटीओकडे अपलोड करत आहेत.

औरंगाबाद शहरात गेल्या दोन वर्षांपासून कारवाई सुरू असतानाही अनेक वाहनधारक विनामास्क फिरताना आढळून येत आहेत. त्यामुळे कठोर कारवाई करण्याचा निर्णय आरटीओ कार्यालयाने घेतला आहे. आता विनामास्क वाहनधारकांना ई-चालान दिल्यानंतर त्याचा दंड भरला नाही तर लगेच ब्लॅक लिस्ट करण्यात येणार आहे. ही बाब गांभीर्याने घ्यावी असे आवाहन आरटीओ कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे, त्यामुळे यापुढे वाहनधारकांना विनामास्क फिरणे महागात पडणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com