इचलकरंजी अखेर महापालिका होणार; राज्य शासनाकडून अधिसूचना जारी

कोल्हापूर जिल्ह्यात आणखी एक महानगरपालिकेचा समावेश करण्यात आला आहे.
Dhairyasheel Mane
Dhairyasheel Manesaam tv

कोल्हापूर : जिल्ह्यात आणखी एका महानगरपालिकेचा समावेश करण्यात आला आहे. इचलकरंजी महानगरपालिका (Ichalkaranji) होणार असून त्याबाबतची अधिसूचनाही राज्य शासनाकडून (Maharashtra Government) जारी करण्यात आलीय. इचलकरंची महापालिका करण्याबाबत अनेक वर्षांपासून मागणी केली जात होती.आता अखेर नागरिकांच्या मागणीला यश आले असून इचलकरंजीचं रुपांतर महापालिकेत (Municipal corporation) होणार आहे. इचलकरंजी अत्यंत महत्वाचं शहर म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे इचलकरंजी महानगरपालिका होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.आहे तीच हद्द ठेवून इचलकरंजीचं महापालिकेत रुपांतर होत आहे. दरम्यान, इचलकरंजी राज्यातील २८ वी महापालिका होणार आहे. याबाबतची घोषणा कोल्हापूरचे खासदार धैर्यशील माने यांनी केलीय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com