जालना : रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) हे आपल्या वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असतात. दानवे यांची बोलण्याची शैली ही सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे. अशातच आता दानवे त्यांच्या आणखी एका वक्तव्यामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. जालन्यात परशुराम जयंती (Parashuram Jayanti) निमित्त एका कार्यक्रमात दानवे आले असता, त्यांच्याकडे आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीत जालना शहरात ब्राम्हण समाजाच्या लोकांना एका पेक्षा जास्त नगरसेवकपदे द्या; अशी मागणी ब्राह्मण समाजातील सुनील किंगावकर यांनी त्यांच्या भाषणादरम्यान केली.
सुनील किंगावकर यांच्या भाषणादरम्यान केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे बोलायला आले असता, ते म्हणाले, यावेळी मी कुणी एका ब्राह्मणांला नगरसेवक किंवा नगराध्यक्ष म्हणून पाहू इच्छित नाही, तर मी ब्राम्हणांना या राज्याच्या मुख्यमंत्रिपदी (CM) पाहू इच्छितो, असं वक्तव्य दानवे यांनी केलं. त्यामुळे राज्यात पुन्हा ब्राम्हण मुख्यमंत्री भाजप देणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. दानवे यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
आत्ताचे मुख्यमंत्री परशुरामच -
दरम्यान, याच कार्यक्रमात आत्ताचे मुख्यमंत्री परशुरामच आहेत, त्यामुळे करूया, या भानगडी सोडून द्या असा टोला शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी दानवेंना लगावला. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या विधानानंतर अर्जुन खोतकर (Former Shiv Sena Minister Arjun Khotkar) यांनी बोचरी टीका केला. आत्ताचे मुख्यमंत्री परशुरामच आहेत, ते म्हणजे उद्धव ठाकरे. तसंच यापूर्वीही मनोहर जोशी हेही परशुरामच होते, असं म्हणत त्यांनी दानवे यांना करूया, या भानगडी सोडून द्या म्हणत, ते होतील. ते आमचे मित्रच आहेत. देवेंद्र फडणवीस आमचे मित्र आहेत. त्यांच्या इतक्या जवळचा माझ्याइतका कुणी नाही, असं म्हणत दानवे यांना टोला लगावला आहे.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.