अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar District) पारनेर तालुक्यामध्य़े विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार अमोल मिटकरी आले होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना भाजप खासदार किरीट सोमय्या व वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, 'उठसूठ कालपर्यंत महाविकास आघाडीवर तोंडसुख घेणारे किरीट सोमय्या (Kirit Somaiya) विक्रांत घोटाळा करून कुठे लपून बसले आहेत याचा शोध आता घेतला पाहिजे. (Amol Mitkar on Silver Oak Attack Case)
सर्वोच्च न्यायालयाने आज त्यांचा जामीन नाकारला आहे. सोमय्या पिता-पूत्र दोघेही गायब आहेत. ते कुठे दडून बसले आहेत. गुजरातला पळून गेले, मुंबईत आहेत की नागपूरला आहेत की दिल्लीत अमित शहांकडे आहेत. याचा शोध घेतला पाहिजे. विक्रांत घोटाळा हे गंभीर प्रकरण आहे. सैनिकांच्या विषयी तो आहे. त्यामुळे सोमय्या पिता-पुत्रांना ताबडतोब अटक झाली पाहिजे, अशी मागणी मिटकरी (Amol Mitkari) यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, एसटी कर्मचारी बांधव अनेक दिवसांपासून आझाद मैदानावर आंदोलनासाठी बसले होते. त्यांच्याकडून 513 रुपयांप्रमाणे निधी गोळा करण्यात आला. या पैशाची बेरीज 15 कोटी रुपयांपेक्षाही जास्त जाते. तो पैसा सदावर्ते यांनी हडपल्याचा अंदाज आम्ही वर्तवित आहोत.
हे देखील पहा -
तसंच सदावर्ते यांनी सुनियोजित पद्धतीने चिथावणीखोर भाषणे देऊन सिल्व्हर ओकवर हल्ला घडवून आणला. त्यांची पोलिस कोठडी आज दोन दिवसांनी वाढवून देण्यात आली आहे. मात्र सरकारी वकिलांनी युक्तीवाद करताना सांगितले की, हल्ला ज्या दिवशी घडला त्या दिवशी सदावर्तेंना व्हॉटसअॅपवर दोन कॉल आले होते. ते दोन्ही कॉल नागपूरवरून आले होते.
आमचा अंदाज होता की सदावर्ते हा मोहरा आहे. मात्र सदावर्तेचा मास्टरमाईंड कुठे लपून बसला आहे. माझी राज्यातील गृहविभागाला विनंती आहे की, नागपूरमधील (Nagpur) मास्टरमाईंडने व्हॉटसअॅप कॉल केले. अनेक युट्युब चॅनेल तेथे बोलावले. तेथे जीवघेणा हल्ल्याचा कट आखला असेल तर नागपूरवरुन दोन WhatsApp कॉल कुणाचे आले. नागपूरमधील मास्टरमाईंड कोण आहे. मला ते माहिती आहे मात्र सध्या मी ते सांगणार नाही. लवकरच महाराष्ट्रातील जनतेसमोर दूध का दूध पाणी का पाणी झाल्याशिवाय राहणार नाही, असेही मिटकरी यांनी सांगितले.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.