International yoga day/ Nitin Gadkari
International yoga day/ Nitin GadkariSaam TV

International Yoga Day 2022: ...तेव्हापासून मी योगा करायला लागलो; गडकरींनी सांगितलं कारण

माझी आईसुद्धा योग प्रसारच काम करायची, मी रोज एक तास योग करतो त्यामुळे माझं स्वास्थ्य चांगलं राहतं - नितीन गडकरी
Published on

नागपूर : नागपूरच्या कस्तुरचंद पार्क येथे आज आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिवस (International Yoga Day) कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमा दरम्यान बोलताना गडकरी म्हणाले, 'आज आपण ८ वा योग दिवस साजरा करत आहोत, दोन वर्षे हा दिवस साजरा करता आला नाही. आपल्याला करता आलं नाही. पंतप्रधानांची ही संकल्पना दूर पर्यंत पोहचली.

ते पुढे म्हणाले, 'अनेक देशात योग पोहचला आहे. मी रोज एक तास योग करतो त्यामुळे माझं स्वास्थ्य चांगलं राहतं. योग सगळ्यांसाठी महत्वाचं आहे. तसंच सगळ्या प्रदूषणापासून (Pollution) मुक्ती मिळावी, स्वच्छ पाणी मिळावे, चांगले गार्डन असावे ज्याचा वापर नागरिकांना करता यावा. देशात योगाचा प्रचार करणाऱ्यांना विदेशात मोठ्या प्रमाणात सन्मान आहे. आपण नियमित योग करण्याचा संकल्प करू असही ते म्हणाले.

International yoga day/ Nitin Gadkari
दिंडीत घुसला भरधाव कंटनेर; एका वारकऱ्याचा मृत्यू; तीन जखमी

माझी आईसुद्धा योग प्रसारच काम करत होती. माझी तब्बेत बिघडली तेव्हापासून मी याकडे वळलो आणि योग करायला लागलो. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी मला एका कार्यक्रमात विचारल, 'तुम्ही काय करता, तुमचं वय १० वर्ष कमी वाटतं, मी त्यांना सांगितलं मी योग करतो.' असा किस्सा देखील त्यांनी या कार्यक्रमात सांगितला.

तसंच अनेक भारतीय विदेशात योगाचे धडे देतात त्यातून त्यांची कमाई सुद्धा होते. सगळ्यांनी रोज योगा केला तर स्वास्थ चांगलं राहील असा सल्लाही त्यांनी योग दिनानिमित्त उपस्थित नागरिकांना दिला.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com