Junnar News : पत्नी गेल्याच्या धक्क्याने पतीनेही केली आत्महत्या; संपूर्ण गावावर दु:खाची लाट

वारुळवारडी येथे ऊस वाहतूक करणारी ट्रॉली आणि दुचाकीचा मोठा अपघात झाला.
Junner News
Junner News Rohidas Gadge
Published On

Junnar News : जवळील व्यक्तीचे निधन झाल्याने बसणारा धक्का फार मोठा असतो. अनेक व्यक्ती या धक्क्यातून बाहेर येण्यासाठी मोठा कालावधी घेतात. तर काहींना अशा धक्क्यांनी हृदय विकाराचे झटके देखील येतात. अशात जुन्नरमध्ये अशीच एक हृदय हेलावणारी घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण गाव हादरून गेले आहे. पत्नी गेल्याचे दु:ख सहन न झाल्याने पतीनेही आत्महत्या केली आहे. या घटनेने गावात सर्व व्यक्ती हळहळ व्यक्त करत आहेत. (Latest Marathi News)

समोर आलेल्या माहितीनुसार, विद्या कामनसर आणि रमेश या दोघांचा मृत्यू झाला आहे. हे दोघे पती पत्नी जुन्नरमधील (Junnar) रहिवासी होते. दोघांचा सुखी संसार सुरू होता. मात्र काही दिवसांतच त्यांचा सुखी संसार भंगला. अचानक विद्याची तब्येत बिघडली. त्यामुळे उपचारांसाठी तिला वारुळवाडी रुग्णालयात (Hospital) दाखल केले. चार दिवसांपूर्वी ती दुचाकीवरून उपचार घेऊन घरी परतत असताना काळाने घात केला. नारायणगाव जवळील वारुळवारडी येथे ऊस वाहतूक करणारी ट्रॉली आणि दुचाकीचा मोठा अपघात झाला. या अपघातात विद्याचा मृत्यू झाला.

Junner News
वीज पडून शेतकऱ्याच्या १२ शेळ्या दगावल्या; जुन्नर तालुक्यातील घटना

आपल्या २२ वर्षीय पत्नीच्या निधनाने रमेश फार खचून गेला होता. इतक्या लवकर होत्याचे नव्हते होईल असा त्याने विचारही केला नव्हता. हा पत्नीच्या निधनाचा धक्का तो पचवू शकला नाही. यातच त्याने देखील स्वत:चे जीवन संपवण्यायचा निर्णय घेतला. रमेशनेही लगेचच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या कुटुंबियांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र जगण्याची त्याची उमेद संपल्याने औषधांचा त्याच्या तब्येतीवर काहीही परिणाम होत नव्हता. अखेर आज त्याने देखील या जगाचा निरोप घेतला. गावातील तरुण दांपत्यासच्या अशा निधनाने संपूर्ण गाव शोक सागरात बुडाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com