Human Skin Jackets : भयंकर! चक्क माणसाच्या त्वचेपासून बनवलं जॅकेट; फोटो पाहून तुमचंही डोकं चक्रावेल

ऑनलाईन पद्धतीने माणसाच्या त्वचेपासून तयार केलेलं एक जॅकेट मिळत आहे.
Human Skin Jackets
Human Skin JacketsSaam TV

Online Shopping : ऑनलाईन शॉपींगची हौस प्रत्येकालाच असते. आपल्याला हवी ती वस्तू हवे ते कपडे कुठेही न जाता घरबसल्या मिळवता येतात. त्यामुळे आजकाल बहुसंख्य व्यक्ती ऑनलाईन शॉपींगला पसंती दाखवतात. आजवर कपडे खरेदीसाठी ऑनलाईन पर्याय निवडला असेल तर तुम्हाला माहित असेल की, यावर अनेक अतरंगी फॅशनचे कपडे उपलब्ध आहेत. अशात ऑनलाईन पद्धतीने माणसाच्या त्वचेपासून तयार केलेलं एक जॅकेट मिळत आहे. (Trending Fashion Jackets)

हे जॅकेट सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरंल होतंय. माणसाच्या त्वचेपासून तयार करण्यात आलेलं हे जॅकेट पाहून सर्वत्र राग आणि संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे सोशल मीडियावर ऑनलाईन पद्धतीने अशा जॅकेटची विक्री करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याचं काम सुरू आहे.

Human Skin Jackets
Diwali Shopping : कमी किंमतीत खरेदी करायची आहे? 'या' शॉपिंग साइट्सवरुन करा

न्यूयॉर्क पोस्टच्या एका रिपोर्टनुसार, हे जॅकेट ऑनलाईन पद्धतिनेच उपलब्ध आहे. ऑर्डर केल्यावर तीन आठवड्यांनी तुम्हाला तुमचे जॅकेट मिळते. सोशल मीडियावर तुम्हाला या जॅकेटसाठी ऑर्डर द्यावी लागते. यावेळी तुम्हाला छान वाटत असलेला कोणताही ड्रेस किंवा जॅकेट तुमच्याकडून घेतला जातो. तीन आठवडे यावर काम केल्यानंतर माणसाच्या त्वचेप्रमाणे हे जॅकेट दिसते.

Human Skin Jackets
Mumbai Shop Name | दुकानांच्या अमराठी पाट्यांवर कारवाई होणार, दुकांनावर मराठीत नाव लिहीणं बंधनकारक

माणसाच्या त्वचेसारखं अगदी हुबेहूब बनवण्याची त्या व्यक्तीची कला आहे. मात्र अशा प्रकारे फक्त जॅकेट आणि कपडे नाही तर चप्पल, टोपी अशा वस्तूंना देखील माणसाच्या त्वचेपासून बणवण्यात आलं आहे. याविषयी सातत्याने येत असलेली माहिती लक्षात घेता आम्ही या विषयी चौकशी केली.

माणसाच्या त्वचेची कपडे विकत असलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिले आहे की, माणसाच्या त्वचेपासून बनवण्यात आलेलं जॅकेट खरोखर माणसाची त्वचा वापरून बनवलेलं नाही. यात वापरण्यात आलेल्या पदार्थांची माहिती आणि जॅकेट तयार होण्याची माहिती यात देण्यात आली आहे. मात्र हे बनवणाऱ्या व्यक्तीने जॅकेट इतकं बारीक काम करून बणवलं आहे की, खरोखर वस्तू आणि कपड्यांवर माणसाची त्वचा लावल्यासारखं वाटत आहे. यामध्ये फक्त त्वचाच नाही तर डोळे, ओठ अशा गोष्टी देखील काढण्यात आल्या आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com