कोर्टाचा दिलासा एकाच पक्षातील लोकांना कसा काय मिळतो; संजय राऊतांची भाजपवर टीका

आजचा सुप्रिम कोर्टाचा निकाल हा राज्य सरकारला धक्का नाही. तर कोणाला तरी दिलासा देण्याचा आणखी एक प्रयत्न आहे.
Sanjay Raut News
Sanjay Raut News Saam TV
Published On

नागपूर: मुंबईचे (Mumbai) माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयने (Supreme Court) महाविकास आघाडी सरकारला मोठा झटका दिला आहे. परमबीर सिंहांच्या (Param Bir Singh) सर्व प्रकरणाचा तपास सीबीआयकडे (CBI) देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. परमबीर सिंहांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये केलेल्या याचिकेप्रमाणे त्यांना कारवाईपासून संरक्षण देखील मिळाले होते. याचबरोबर त्यांनी आपल्यावर सर्व प्रकरणांचा तपास सीबीआयकडे सोपवला जावा अशी मागणी देखील सर्वोच्च न्यायलयाकडे (Court) केली होती. यापार्श्वभूमीवर शिनसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. हा राज्य सरकारला धक्का नाही. तर कोणाला तरी दिलासा देण्याचा आणखी एक प्रयत्न असल्याचा राऊत म्हणाले.

महाराष्ट्र सरकारकडून सिंह यांच्यावर दाखल गुन्ह्यांचा तपास मुंबई पोलीस आणि सीआयडीकडून (CID) सुरु होता. मात्र, आता महाराष्ट्र सरकारला हा मोठा झटका बसणार आहे. कारण, या सर्व प्रकरणांचा तपास आता सीबीआयकडे वर्ग करण्यात येणार आहे. यामुळे सीबीआयकडून (CBI) या सर्व प्रकरणांचा तपास कसा केला जातो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Sanjay Raut News
Parambir Singh Case | परमबीर सिंग प्रकरणाचा तपास आता CBI कडे !;पाहा व्हिडीओ

खासदार संजय राऊत काय म्हणाले?

आजचा सुप्रिम कोर्टाचा (Supreme Court) निकाल हा राज्य सरकारला धक्का नाही. तर कोणाला तरी दिलासा देण्याचा आणखी एक प्रयत्न आहे. 'किसी को राहत देने की एक और कोशिश है...जब जब महाराष्ट्र सरकार असली गुन्हेगारों तक पहुंचने की कोशिश करती है, ॲक्शन लेने की कोशिश करती है. तो इस प्रकार से दिलासा मिलता है'. दिलासा एकाच पक्षातील लोकांना कसा काय मिळतो हे आश्चर्य आहे असही (Sanjay Raut)राऊत म्हणाले.

आमचे पोलीस सक्षम आहेत. महाराष्ट्र पोलीस (Police) निष्पक्ष तपास करू शकत नाहीत, असा ठपका आपण कसा ठेवू शकता. महाराष्ट्र पोलीस देशातील सर्वात जास्त निष्पक्ष पोलीस आहेत. तरी त्यांच्यावर अशा प्रकारचा ठपका ठेवून कुठेतरी महाराष्ट्राच्या विरोधात खूप मोठ षड्यंत्र रचले जात आहे. राज्यावर कटकारस्थान केले जात आहे. हे दुर्दैव आहे.

महाराष्ट्राची जनता नोंद घेते

महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्राचे पोलिस (Police) या सर्व प्रकरणांमध्ये एका विशिष्ट निर्णयापर्यंत, तपासाच्या एका टोकापर्यंत आल्यावरती असे दिलासे मिळत आहेत. असे दिलासे मग इतरांना का मिळत नाहीत. जेव्हा जेव्हा पोलीस मुख्य आरोपीवर कारवाई पर्यंत येतात तेव्हा दिलासा मिळतो. सुबोध जयस्वाल यांच्यावर आमचा विश्वास आहे. त्यांना राज्याची परिस्थिती पूर्णपणे माहिती आहे, असही राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com