Vodafone - idea Network issue | जितेंद्र आव्हाडांनाही रेंज मिळेना

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्होडाफोन - आयडिया या टेलिकॉम कंपनीला नेटवर्क सुधारण्याची विनंती ट्विटरद्वारे केली आहे.
Vodafone - idea Network issue | जितेंद्र आव्हाडांनाही रेंज मिळेना
Vodafone - idea Network issue | जितेंद्र आव्हाडांनाही रेंज मिळेनाSaam Tv News
Published On

मोबाईलला नेटवर्क किंवा रेंज मिळत नाही(mobile range issue), कॉल ड्रॉप (call drop) होतो, इंटरनेट फास्ट चालत नाही (slow internet issue) अशा अनेक तक्रारी आपण नेहमी करत असतो. मोबाईल नेटवर्क संबंधात हाच त्रास होतोय राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (housing minister jitendra awhad) यांना. मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याही मोबाईलला व्यवस्थित नेटवर्क मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. व्होडाफोन - आयडिया (vodafone - idea) या टेलिकॉम कंपनीला नेटवर्क सुधारण्याची विनंती त्यांनी ट्विटरद्वारे केली आहे. (housing minister jitendra awhad facing mobile network issue)

व्होडाफोन - आयडिया या दोन टेलिकॉम कंपन्यांचे विलगीकरण झाल्यापासून त्यांनी 'Vi' (व्होडाफोनचा V आणि आयडियाचा, उच्चार - वुई) नावाने ऑगस्ट २०१८ मध्ये रीब्रॅंड करुन लॉन्च केले होते. जियो या नव्या कंपनीला टक्कर देण्यासाठी तेव्हा व्होडाफोन आणि आयडिया एकत्र आले होते. त्यामुळे Vi ही भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी बनली होती. मात्र असं असलं तरी या कंपनीच्या ग्राहकांना नीट नेटवर्क मिळत नसल्याच्या तक्रारी येत असतात. आता याचाच प्रत्यय जितेंद्र आव्हाडांनाही आल्याचे दिसत आहे.

हे देखील पहा -

दरम्यान भारतीय दुरसंचार क्षेत्रात जियो, एअरटेल आणि वुई (व्होडाफोन - आयडिया) या तीन मुख्य कंपन्या आहेत. त्यात जियो आणि एअरटेलमध्ये जोरदार स्पर्धा दिसते. एअरटेलने काही महीन्यांपुर्वी भारताच्या काही भागात 5G सुविधाही सुरु केली आहे. तसेच जियोचे देखील 5G ट्रायल सुरु झाले आहे. त्यामुळे टेलिकॉम क्षेत्रात टिकुन राहण्यासाठी ग्राहकांना स्वस्त आणि दर्जेदार सेवा देण्यासाठी या कंपन्यांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com