Hingoli : शेतावरून घरी निघाल्या, ओढा ओलांडताना घात झाला; २ शेतकरी महिला बेपत्ता

Hingoli News : हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे ओढ्याला आलेल्या पुरामध्ये दोन शेतकरी महिला वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या महिला शेतकाम करुन परतत असताना ही घटना घडली.
Hingoli News
Hingoli Newssaam tv
Published On
Summary
  1. हिंगोलीत ओढ्याला आलेल्या पुरात दोन शेतकरी महिला वाहून गेल्या.

  2. गयाबाई सारोळे (६०) आणि सखुबाई भालेराव (४०) यांची नावे समोर.

  3. जिल्ह्यात आतापर्यंत पावसामुळे पाच जणांचा मृत्यू.

संदीप नागरे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Hingoli : हिंगोलीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. हिंगोलीच्या वरसत तालुक्याच्या गुंडा गावात शेतकरी महिला पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. शेतात काम करुन परतत असताना ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यात दोन शेतकरी महिला वाहून गेल्याचे म्हटले जात आहे. या दोन्ही महिलांचा शोध घेण्यास सुरुवात झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेतात काम करुन परत येताना पुराच्या पाण्यात गयाबाई सारोळे (वय ६० वर्षे) आणि सखुबाई भालेराव (वय ४० वर्षे) या दोघी वाहून गेल्याची गावकऱ्यांनी माहिती दिली आहे. आतापर्यंत पुराच्या पाण्यामुळे हिंगोली जिल्ह्यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये तीन शेतकरी आणि दोन पर्यटकांचा समावेश आहे.

Hingoli News
Beed : मोठी बातमी! माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्यासोबतच्या प्रेमसंबंधाची डान्सर पूजा गायकवाडची कबुली

हिंगोलीत मुसळधार पावसामुळे ओढ्याला आलेल्या पुरात दोन शेतकरी महिला वाहून गेल्याची घटना घडली आहे. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गुंडा गावच्या या महिला होत्या शेतातील कामकाज आटोपून घरी परतत येत असताना गावाच्या जवळून वाहणाऱ्या ओढ्यात त्या वाहून गेल्या. त्यांच्यासोबत असलेल्या काही जणांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने या महिलांना वाचवने अशक्य बनले गयाबाई सारोळे सखुबाई भालेराव अशी या वाहून गेलेल्या दोन महिलांची नावे आहेत.

Hingoli News
Beed Crime : बीडमध्ये पत्नीकडून पतीला लाथाबुक्क्यांनी मारहाण, अवघड जागी मार लागल्याने पतीचा मृत्यू

ग्रामस्थांनी महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून वाहून गेलेल्या या महिलांचा शोध घेतला मात्र अद्याप शोध लागला नसल्याने उद्या सकाळी पुन्हा शोधून सुरू करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले आहे तर हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पाच जण पुराच्या पाण्यात वाहून गेले आहे यामध्ये दोन महिला शेतकरी एक पुरुष शेतकरी तर दोन पर्यटकांचा समावेश आहे, जिल्हाभरात अजूनही संततधार पाऊस सुरू असल्याने अनेक भागात पूर आल्याने नागरिकांनी धोकादायक स्थितीत प्रवास टाळावा व सतर्क रहावे असे आवाहन हिंगोली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.

Hingoli News
Beed : बीडचे माजी उपसरपंच मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट, पूजा गायकवाडच्या नावावर प्लॉट केल्याची धक्कादायक माहिती समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com