Hingoli Accident News: देवदर्शनाला जाताना काळाचा घाला! भरधाव पिकअपने भाविकांना चिरडले; ४ जागीच ठार; ५ जखमी

Hingoli Washim Highway Accident: हिंगोली वाशिम राष्ट्रीय महामार्गावर भरधाव पीकअपने ९ भाविकांना चिरडल्याची घटना घडली. या अपघातात चार भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून ५ जण गंभीर जखमी झालेत.
Hingoli Washim Highway Accident
Hingoli Washim Highway AccidentSaamtv

Hingoli Accident News:

हिंगोलीमधून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. हिंगोली वाशिम राष्ट्रीय महामार्गावर भरधाव पीकअपने ९ भाविकांना चिरडल्याची घटना घडली. या अपघातात चार भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून ५ जण गंभीर जखमी झालेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, देवदर्शनासाठी पायी निघालेल्या भाविकांना भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकप वाहनाने चिरडल्याची घटना घडली. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर पाच जण गंभीर जखमी झाले आहे. हे सर्व भाविक हिंगोली तालुक्यातील सिरसम गावचे रहिवासी आहेत.

आज (२४, फेब्रुवारी) शनिवारचा दिवस असल्याने हे भाविक सिरसम येथून माळहिवरा पाटी येथील मारुतीच्या दर्शनाला निघाले होते. मात्र या भीषण अपघातात पाच जणांचा वाटेतच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच जखमी भाविकांना हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

Hingoli Washim Highway Accident
Maratha Reservation: जिल्हानिहाय आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मराठा कार्यकर्त्यांना आंदोलनापूर्वीच नोटीसा

जत-जांबोटी महामार्गावर भीषण अपघात..

 जत-जांबोटी राज्य महामार्गावरील मुगळखोडजवळ (ता. रायबाग) शुक्रवारी (२३ फेब्रुवारी) सायंकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या कारने आधी दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. यानंतर कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. या घटनेत ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Hingoli Washim Highway Accident
Divyang Bhavan: प्रत्येक जिल्ह्यात उभारण्यात येणार दिव्यांग भवन : उपमुख्यमंत्री अजित पवार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com