Hingoli News: अखेर पर्दाफाश! पाण्यावर तरंगणाऱ्या बाबाचा दावा ठरला फोल, 'अंनिस'चा पदाधिकारीही तरंगला, अंधश्रद्धा नव्हे...

संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या ग्रंथाचा अभ्यास केल्याने सिद्धी प्राप्त झाल्याचा दावा त्यांनी केला होता
Hingoli News
Hingoli NewsSaamtv
Published On

Hingoli News: गेल्या काही दिवसांपासून हिंगोली तालुक्यातील पाण्यावर तरंगणारे बाबा चांगलेच चर्चेत आले होते. भागवताचार्य हरिभाऊ राठोड यांच्या या व्हायरल व्हिडिओची (Viral Video) सर्वत्र रंगली होती. संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या ग्रंथाचा अभ्यास केल्याने सिद्धी प्राप्त झाल्याचा दावा त्यांनी केला होता. मात्र त्यांचा हा दावा फोल ठरवत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी पर्दाफाश केला आहे. (Latest Marathi News)

Hingoli News
Devendra Fadnavis News: नेमकं फडतूस कोण हे अख्य्या महाराष्ट्राला महिती, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार

याबाबत अधिक माहिती अशी की, सिद्धी प्राप्त झाल्याचा दावा करत तासंतास पाण्यावर तरंगणाऱ्या बाबाचा हिंगोलीत (Hingoli) अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी पर्दाफाश केला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी आपल्या सहकाऱ्यांना घेऊन सकाळीच पाण्यावर तरंगणारा बाबा राहत असलेल्या धोत्रा गावामध्ये पोहोचले.

या बाबासोबत चर्चा केल्यानंतर अनिस कार्यकर्ते व पोलीस अधिकाऱ्यांनी धोत्रा शिवारातील विहीर गाठली आणि या विहिरीमध्ये सिद्धी प्राप्त झाल्याचा दावा करणारे हरी महाराज आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी प्रकाश मगरे या दोघांनीही विहिरीत उड्या टाकल्या.

Hingoli News
MPSC Success Story : झेडपीच्या शाळेत शिकलेल्या बीडच्या सीमा शेखने राेवला एमपीएससीत झेंडा; राज्यात महिलांत प्रथम

विहिरीमध्ये महाराजांप्रमाणेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी देखील पाण्यावर तरंगत असल्याचे स्पष्ट झाले. मात्र नेहमीचा सराव नसल्याने या बाबासारखे जास्त वेळ ते पाण्यावर तरंगू शकले नाहीत, यानंतर पाण्यावर तरंगणाऱ्या या बाबाने सिद्धी प्राप्त झाल्याच्या दाव्यावरून घुमजाव केले आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी देखील हा चमत्कार नसून सराव केल्याने कुणालाही होता येत असल्याचे यावेळी सांगितले आहे, त्यामुळे या बाबांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस अधिकारी व अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com