Maharashtra Reservation : 'दोन दिवसात गुन्हे मागे घेतो म्हणत दोन महिने झाले तरी घेतले नाही', जरांगे पाटीलांचा पुन्हा सरकारवर हल्लाबोल

Manoj Jarange Patil in Hingoli: 'दोन दिवसात गुन्हे मागे घेतो म्हणत दोन महिने झाले तरी घेतले नाही', जरांगे पाटीलांचा पुन्हा सरकारवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil in Hingoli
Manoj Jarange Patil in HingoliSaam Tv
Published On

Manoj Jarange Patil in Hingoli:

'सरकारने दोन दिवसात गुन्हे मागे घेऊ म्हटलं होतं. दोन महिने झाले तरी गुन्हे मागे घेतले नाहीत'', असं म्हणत मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा सरकारला लक्ष्य केलं आहे. हिंगोली येथे जाहीर सभेला संबोधित करताना ते असं म्हणाले आहेत.

ते म्हणाले, ''मराठा आरक्षणासाठी लढा अनेक वर्षांपासून सुरू असल्याने आम्ही शांततेत उपोषण सुरू केले. सर्व महिला आंदोलनात येऊन बसल्या. अचानक सरकारला काय झालं माहित नाही, उपस्थित असलेल्या सगळ्यांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. आम्ही काय चूक केली होती, आमच्या आई बहिणींना मारहाण केली.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Manoj Jarange Patil in Hingoli
Anju On PM Modi: पाकिस्तानातही PM मोदींचे चाहते, त्यांनाही असा नेता हवा; अंजूने सांगितली लोकांची इच्छा

''इतके निर्दयी सरकार माझ्या जीवनात पहिल्यांदा पाहिले''

जरांगे पाटील म्हणाले, ''आम्ही आमच्या लेकरासाठी आरक्षण मागत होतो, म्हणून तुम्ही (सरकार) लाठीचार्ज केला. हल्यात बेशुद्ध झालेल्या महिलांचे शुद्धीवर आल्यावर फोन आले. आता आरक्षण घ्यायचे, असे त्यांनी सांगितले. इतके निर्दयी सरकार माझ्या जीवनात पहिल्यांदा पाहिले. सरकारला आम्ही प्रश्न विचारला पण आतापर्यंत उत्तर दिले नाही. आमच्यावर हल्ला झाला आणि आमच्यावर 307 सारखा गुन्हा दाखल करण्यात आला. 353 सारखे गुन्हे आमच्यावर दाखल करण्यात आले. हे सर्व खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.'' (Latest Marathi News)

ते म्हणाले, महिलांनी आरक्षणासाठी जागरूकता करावी. आज 35 लाख मराठ्यांना आरक्षण मिळाले आहे, तुम्ही एकजुट रहा, उर्वरित सर्वांना आरक्षण 24 डिसेंबर रोजी मिळणार. मराठा समाजाच्या लेकरांच्या पदरात आरक्षणाचे दान टाकण्यासाठी प्रयत्न करा, आंदोलने करताना शांततेत करा, जाळपोळ उद्रेक करू नका, असे आवाहनही त्यांनी केलं.

Manoj Jarange Patil in Hingoli
Maharashtra Politics: 'मंत्रीपद नसलं तरी कोट घाला..' वैभव नाईकांची कोपरखळी, गोगावलेंनी थेट ऑफर दिली; ठाकरे- शिंदे गटात जोरदार जुगलबंदी!

यावेळी जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले आहेत की, ''छगन भुजबळ यांना राज्यात जातीय दंगली घडवायच्या आहेत, तेढ निर्माण करायची आहे. ओबीसी बांधव आपले आहेत. छगन भुजबळ यांचे स्वप्न पूर्ण होऊ देऊ नका.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com