नागपूरात उपचार करणाऱ्यांनाच तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका

आरोग्य सेवक आणि फ्रंट लाइन वर्कर्स लसीकरणाबाबत उदासीन
नागपूरात उपचार करणाऱ्यांनाच तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका
नागपूरात उपचार करणाऱ्यांनाच तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका Saam Tv

नागपूर - नागपूरात Nagpur आरोग्य सेवक आणि फ्रंट लाइन वर्कर्स लसीकरणाबाबत Vaccination उदासीन दिसून येत आहेत. आतापर्यंत आरोग्य सेवकांनी Health Workers फक्त 56 टक्के तर फ्रंट लाइन वर्कर्सचं Front Line Worker 35 टक्केच लसीकरण झाले आहे. त्यामुळे नागपूरात तिसरी लाट आल्यास उपचार करणाऱ्यांच याचा सर्वाधीक धोका राहणार आहे.

तिसरी लाट येणार असल्याचा अंदाज आरोग्य यंत्रणांनी व्यक्त केला आहे. अजूनही कोरोनवर Corona ठोस उपचार पद्धती नाही. फक्त लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे संपूर्ण लसीकरणावर भर दिला जात आहे. यात सुरुवातीला आरोग्य सेवक आणि फ्रंट लाइन वर्कर्सचा समावेश होता.

हे देखील पहा -

मात्र, आरोग्य सेवक आणि फ्रंट लाइन वर्कर्स याबाबत उदासीन दिसून येत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 65 हजार 55 आरोग्य सेवकांनी पहिला डोज घेतलाय. यापैकी 36 हजार 828 आरोग्य सेवकांनी दुसरा डोज घेतला आहे . तर 1 लाख 8 हजार 412 हेल्थ वर्कर्स नी पहिला डोज घेतला आहे. यापैकी 41 हजार 577 वर्कर्स नी दुसरा डोज घेतला आहे. ही संख्या वाढविण्याची गरज आहे, आरोग्य सेवक आणि फ्रंट लाइन वर्कर्स नी लसीकरण करावं, असे आवाहन महापौरांनी केले आहे.

नागपूरात उपचार करणाऱ्यांनाच तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका
नगरमध्ये काँग्रेसला पुन्हा वैभवाचे दिवस

कोरोना लसीकरणाबाबत आरोग्य सेवक आणि फ्रंट लाइन वर्कर्स यामध्ये उदासीनता दिसून येत आहे. मात्र, तिसरी आट आल्यास सर्वाधीक धोका याच वर्गाला असणार आहे. त्यामुळे या वर्गाने लसीकरण करणे गरजेचे आहे आणि प्रशासनाने यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com